भारत आणि ब्रिटन यांच्यात सौहादपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याच्या कामात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल शिरीन दिनशॉ मिस्त्री यांना ब्रिटिश दुतावासाकडून ‘एमबीई’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. मिस्त्री या गेली २३ वर्षे ब्रिटिश दुतावासाच्या मुंबई कार्यालयात जनसंपर्क विभागात सेवेत आहेत. सोमवारी मुंबईत ब्रिटिश दुतावासाच्या कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रिन्स विल्यम यांच्या हस्ते शिरीन मिस्त्री यांना प्रदान करण्यात आला. या वेळी विल्यम यांच्या पत्नी प्रिन्सेस केट, ब्रिटिश दुतावासातील उच्चायुक्त कुमार अय्यर यावेळी उपस्थित होते.भारत आणि ब्रिटन यांच्यात सौहादपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याच्या कामात शिरीन मिस्त्री यांनी महत्वाचे योगदान दिले असल्याचे अय्यर यांनी या वेळी सांगितले.