शरद पवारांवर टीका करणाऱ्या गीतेंना तटकरेंचे प्रत्युत्तर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : रायगडमधील शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील राजकीय स्पर्धेचे व कु णबी समाजाला जवळ करण्याच्या राष्ट्रवादीच्या राजकारणाचे पडसाद आता महाविकास आघाडीत उमटू लागले आहेत.

शरद पवार हे आमचे नेते नाहीत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जन्मच खंजीर खुपसण्याच्या राजकारणातून झाल्याची टीका करत युती तुटण्याच्या शक्यतेबाबत शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी भाष्य

के ल्यानंतर गीते यांची अवस्था ‘सहन होत नाही व सांगता येत नाही’ अशी असून त्यांनी पवारांवर के लेली टीका हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी के ली. तर शरद पवार हे देशाचे नेते आहेत असे सांगत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सारवासारव के ली.

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत अनंत गीते यांची सद्दी संपवत सुनील तटकरे यांनी विजय मिळवला.  विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सत्ता समीकरणे बदलली व  महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. त्यानंतरही रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी संघर्ष संपलेला नाही. स्थानिक राजकारणातील वादातून मागील वर्षी भरत गोगावले व उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांना बोलावून घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समेटाचे प्रयत्न के ले. पण ते फारसे यशस्वी झालेले नाहीत. तशात सुनील तटकरे यांनी रायगडमधील स्थानिक राजकारणात प्रभावी असलेला व गीते यांचा आजवर पाठीराखा असलेल्या कु णबी समाजाला जवळ करण्याचे राजकारण सुरू के ले. सोमवारी मुंबईत कु णबी समाजोन्नती संघाचा कार्यक्रम राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होत असताना तिकडे अनंत गीते यांनी राष्ट्रवादीवर तोफ डागत थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र

सोडले.

शरद पवार आमचे नेते नाहीत. राष्ट्रवादीचा जन्मच खंजीर खुपसण्याच्या राजकारणातून झाला अशी विधाने गीते यांनी के ली. त्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena ncp struggle in raigad reverberates in mahavikas alliance akp
First published on: 22-09-2021 at 01:55 IST