मुंबई :  बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर  शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी मंगळवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ठाकरे गटाचे विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह आणखी दोघांविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

हेही वाचा >>> मुंबई : कुस्ती प्रशिक्षकाला अटकेपासून अंतरिम संरक्षण, दहा अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्मृतीस्थळावर नेमके काय घडले याबाबत  सीसीटीव्हीद्वारे पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनीच तक्रार करून ५० ते ६० व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. घटनास्थळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनीही मोबाईलद्वारे घटनेचे चित्रीकरण केले आहे. त्याच, चित्रीकरणाच्या आधारे गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु आहे.  महेश सावंत यांना नोटीस बजावून सोमवारी चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले होते. आता शिवाजी पार्क पोलिसांनी मंगळवारी नवीन गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार महेश सावंत यांच्यासह आणखी दोघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या आठवडय़ात दादर परिसरात होते. त्यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे, आमदार सदा सरवणकर, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, शीतल म्हात्रे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी दाखल झाले होते. त्यानंतर काही वेळाने शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला.  शिंदे गटाने केलेले आरोप ठाकरे गटाने फेटाळून लावले आहेत.