मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर गंज चढत असल्याबाबतचे पत्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आठवडाभरापूर्वीच नौदलाला पाठवल्याचे आता पुढे येत आहे. त्यामुळे या पुतळ्याच्या देखभालीकडे नौदलाचे दुर्लक्ष झाले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा >>> सोसाट्याच्या वाऱ्यांच्या वेगाचे आकलन झाले नसावे : देवेंद्र फडणवीस

छत्रपतींचा पुतळा कोसळण्याच्या सहा दिवस आधी, २० ऑगस्ट रोजी मालवण येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहाय्यक अभियंता यांच्यामार्फत नौदलाचे क्षेत्रिय किनारा सुरक्षा अधिकारी कमांडर अभिषेक कारभारी यांना पाठवलेल्या पत्रात शिवपुतळ्याच्या अवस्थेविषयी तक्रार करण्यात आली होती. पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे यांच्याकडून जून महिन्यात पुतळ्याची डागडुजी करण्यात आली होती.‘ परंतु सद्यास्थितीत पुतळ्याचे जॉइंट करण्यासाठी आपण नट बोल्टचा वापर केला होता. त्या नट बोल्टला आता पावसामुळे व समुद्र किनाऱ्यावरील खारे वारे यामुळे गंज पकडला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विद्रुप दिसत आहे,’ असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या स्तरावरून संबंधित शिल्पकाराला कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना द्याव्यात, असेही या पत्रात कळवण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून आपल्या विभागाने पाठवलेले पत्र प्रसारीत केले.