मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविषयी विडंबनात्मक गाणे प्रसिद्ध करणाऱ्या आरजे मलिष्का हिच्यावर शिवसेना अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सोनू साँगचा आधार घेत काही दिवसांपूर्वी आरजे मलिष्का हिने मुंबई महानगपालिकेच्या कारभारावर टीका केली होती. मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे, रस्त्यांची बिकट अवस्था आणि एकूणच पालिकेचा भ्रष्ट कारभार मलिष्काने या ‘सोनू साँग’च्या माध्यमातून विनोदी पद्धतीने मांडला होता. साहजिकच ही टीका शिवसेनेला चांगलीच झोंबली होती. त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनीदेखील मलिष्काला याच गाण्याच्या भाषेत उत्तर दिले होते. शिवसैनिकांनी गायलेले हे गाणेदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

मलिष्काच्या ‘सोनू साँग’ला किशोरी पेडणेकरांकडून शिवसेना स्टाईल उत्तर

Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Loksatta chavdi happening in Maharashtra politics news on Maharashtra political crisis
चावडी: नाना अन् तात्याचे पारावर उपोषण!
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

मात्र, आता त्यापुढे जात मुंबई महापालिकेची बदनामी केल्याप्रकरणी ९३.५ रेड एफएमवर ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली आहे. शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर आणि अमेय घोले यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता यांची भेट घेऊन रेडिओ वाहिनीवर कायदेशीर कारवाई करुन अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची मागणी केली. ९३.५ रेड एफएमकडून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुंबई पालिकेची बदनामी करणारे गाणे प्रसिद्ध होणे, ही निंदनीय गोष्ट आहे. या गाण्यात पूर्व मुक्त महामार्ग आणि पश्चिम मुक्त महामार्गावरील खड्ड्यांवरून शिवसेनेवर करण्यात आलेली टीका अनाठायी आहे. हे दोन्ही रस्ते अनुक्रमे एमएमआरडीए आणि पीडब्ल्यूडीच्या अखत्यारित येतात. त्याचप्रमाणे लोकल सेवेचा कारभार हा केंद्रीय रेल्वे खात्याशी संबंधित विषय आहे, असे सांगत शिवसेनेने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

सध्या सोशल मीडियावर ‘सोनू साँग’ची प्रचंड क्रेझ आहे. याच धर्तीवर रेड एफएमची सुप्रसिद्ध आरजे मलिष्काने मुंबईच्या खड्ड्यावर उपहासात्मक मराठी गाणे तयार केले होते. या गाण्यातून मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराचे मजेशीर पद्धतीने वाभाडे काढण्यात आले होते. ‘रेड एफएम’वर मुंबईच्या खड्डय़ांचा विषय दरवर्षी नेटाने लावून घेणाऱ्या ‘मुंबईची राणी’ आर. जे. मलिष्काने मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराला लक्ष्य करत ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का..’ हे गाणे यूटय़ूबवर टाकले होते. हा व्हिडिओ अपलोड झाल्यापासून अनेकांनी तो उचलून धरला होता. जवळजवळ सगळ्याच रेडिओ चॅनल्सने आपले स्वतःचे सोनू व्हर्जन बनवले होते. पण त्यामध्ये मलिष्काचा व्हिडिओ सर्वाधिक गाजत आहे. मात्र, पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला ही मस्करी फारशी रूचली नसल्याचे दिसून येते.

rj-malishka-letter