किरीट सोमय्यांनी घेतलेली मराठीविरोधी भूमिका आणि मुंबई तोडण्यासाठी केलेल्या सादरीकरणाचं समर्थन करणार असाल तर माझ्यावर जरुर टीका करा. पण तुमची भूमिका बदलली असेल तर किरीट सोमय्याला तुमच्या शिवतीर्थ बंगल्यावर बोलवा आणि शाल, श्रीफळ देऊन सत्कार करा, त्याच्यासमोर झुका आम्हाला काही म्हणायचं नाही. पण मराठी माणूस हे सहन करणार नाही अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज ठाकरेंच्या आरोपांना तसंच टीकेला प्रत्युत्तर दिलं. शिवराळ भाषा वापरण्यावरुन केलेल्या टीकेवर बोलताना त्यांनी आपल्याला गर्व असल्याचं म्हटलं आहे.

राज ठाकरेंनी शिवराळ भाषेवरुन केलेल्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, “होय…बरोबर आहे. पण ज्यासंदर्भात मी शिवराळ भाषा वापरली त्या शिवराळ भाषेचं कौतुक करायला हवं होतं कारण कालपर्यंत मराठी अभिमानी म्हणून ते मिरवत होते. महाराष्ट्राच्या अस्मितेचे, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे आम्हीच तारणहार आहोत, शिवसेना नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन ते राजकारणात आले आहेत. त्यामुळे त्यांनी जर माझ्या शिवराळ भाषेचं कौतुक केलं असतं किंवा शिवसेनेला पाठिंबा दिला असता तर त्यांचं मराठीप्रेम दिसलं असतं”.

Bhaskar Jadhav On MNS Raj Thackeray
‘मनसेने महायुतीला पाठिंबा दिला की द्यायला लावला?’, भास्कर जाधव यांचा सवाल
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा
young man murdered by throat slit in Ichalkaranjit two accuse were arrested
इचलकरंजीत क्षुल्लक कारणातून तरुणाचा गळा चिरुन खून; दोघांना अटक

“ती हिंमत संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात फक्त….”; राज ठाकरेंनी ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर राऊतांचं प्रत्युत्तर

“किरीट सोमय्यांविरोधात वापरलेल्या शिवराळ भाषेचा मला आणि शिवसेनेला गर्व आहे. माझी उद्धव ठाकरेंशी यावर चर्चा झाली. किरीट सोमय्यांना मी शिवराळ भाषा का वापरली याचा अभ्यास केला असता तर एक मराठी म्हणून माझी वेदना त्यांना समजून घेता आली असती. याच किरीट सोमय्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषा सक्तीची असू नये यासाठी कोर्टात धाव घेतली होती त्यांच्याविरोधात मी शिवराळ भाषा वापरली. हेच किरीट सोमय्या आणि त्यांचे अमराठी बिल्डर्स, फंटर्स यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी सादरीकरण तयार केलं आहे. मुंबई महााराष्ट्रापासून तोडावी, मराठी माणसाचा अधिकार असू नये यासाठी सादरीकरण तयार असून दिल्लीत जाऊन सतत लॉबिंग करत आहेत. किरीट सोमय्या आणि काही बिल्डर्स सूत्रधार आहेत असं समजल्यानंतर तोंडातून शिवी बाहेर पडली असेल तर मराठी जनता मला त्या शिवीबद्दल माफ करेल आणि उत्तेजन देईल. हा शिवसेनेच्या तोंडातून निघालेला अंगार आहे,” असंही संजय राऊत म्हणाले.

‘अजित पवारांवर धाड पण सुप्रिया सुळेंवर नाही’; राज ठाकरेंच्या आरोपांवर अजित पवार म्हणाले “योग्य वेळी…”

“किरीट सोमय्या ज्यांना शिवी घालतो असा आक्षेप आहे त्यांना अजून घालणार कारण ते महाराष्ट्रद्रोही आहेत. आयएनएस विक्रांतचा घोटाळा करणारे किरीट सोमय्या प्रिय असतील तर त्यांना बोलवा आणि तुमच्या वतीने एखादं पदक देऊन टाका. तुमचं रत्न म्हणून मिरवायचं असेल तर त्यांच्या गळ्यात ते पदक घाला. हे ढोंग आणि भंपकपणा सुरु आहे. हे काल पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. एका द्वेषातून तुम्ही हे सर्व बोलत आहाता. हे तुम्ही बोलत नसून कोणीतरी तुमच्या तोंडाला आपल्या पक्षाचा भोंगा लावला आहे. तुम्ही फक्त फुंका मारत आहात. महाराष्ट्राच्या जनतेला यात रस नाही,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

महाराष्ट्रावर जर कोणी अशाप्रकारे थुंकण्याचा प्रयत्न करत असेल तर माझ्यासारखा प्रत्येक शिवसैनिक, मराठी माणूस अशाच प्रकारची शिवराळ भाषा वापरेल असा इशारा संजय राऊतांनी दिला. ज्यांना ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत उत्तर द्यावं असं बाळासाहेब आणि आचार्य अत्रे यांनी सांगितलं होतं. ते आमचे दैवत आहेत, तुमचे नसतील. तुमचे म्हसोबा बदलले असतील. दुसरे शेंदूर लावून फिरत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका. तुमची अक्कल दीड वर्ष ईडी कार्यालयात गहाण पडली होती. ती काल सोडवण्यात आल्याने तुमचे भोंगे वाजू लागले आहेत ते महाराष्ट्राची जनता बंद करेल असंही ते म्हणाले. आज बाळासाहेब ठाकरे असते तर काय बोलले असते अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

नागानं फणा काढावा असा चेहरा आहे म्हणणाऱ्या राज ठाकरेंना आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले “तुमचा चेहरा कोंबडीच्या…”

“बाळासाहेब ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यासंबंधी भूमिका मांडली होती. पण हा भाजपाचा भोंगा आहे. ईडीची कारवाई झाली त्याबद्दल भाजपाने सूट दिली असून त्यानंतर हा भोंगा सुरु झाला आहे. दीड वर्ष हा भोंगा बंद होता,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“हिंदुत्व आम्हाला शिकवण्याची गरज नाही, ते आमच्या रक्तात आहे. जेव्हा हिंदुत्वावर हल्ला झाला आहे तेव्हा भाजपा आणि त्यांचे भोंगे समोर नव्हते. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शिवसेना हिंदुत्वासाठी लढली आहे. कालची गोष्ट सोडून द्या, रात गई बात गई…दिवा विझताना मोठा होतो आणि तसंच झालं आहे,” असा टोला संजय राऊतांनी लगावला.

दिवा विझताना मोठा होतो म्हणणाऱ्या संजय राऊतांना मनसेने दिलं उत्तर; म्हणाले “संपादक जेलमध्ये जाणार….”

“काही गोष्टींकडे राजकारणात दुर्लक्ष केलं पाहिजे. हा भाजपाचा भोंगा असल्याचं सर्वांना माहिती आहे. जे महाविकास आघाडीसोबत थेट लढू शकत नाहीत ते असे भोंगे लावून माहौल तयार करत आहेत. अशा लोकांना आमच्याविरोधात बोलण्यास लावलं जात असून राजकीय पोळ्या भाजत असतात,” अशी टीका संजय राऊतांनी केली.

“अल्टिमेटम राज्य सरकारला कोणी देत नाही. अल्टिमेटम देण्याची हिंमत या देशात आणि महाराष्ट्रात फक्त बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती. बाळासाहेबांनी दहशतवाद्यांना अल्टिमेटम दिला होता. अमरनाथ, वैष्णेदेवी यात्रा असो किंवा दहशतवादी कारवाया…अल्टिमेटम देण्याची ताकद आणि कुवत राजकारणात, देशात फक्त बाळासाहेबांमध्ये होती,” असं यावेळी संजय राऊत म्हणाले.

“ईडीच्या कारवाईबाबत केंद्राकडून अभय मिळाल्याने हा भोंगा वाजू लागला आहे. खोट्या कारवायंविरोधात आम्ही लढत आहोत, आम्हाला चिंता नाही. आमच्या नकला करा, खोटं बोला पण शिवसेना, महाविकास आघाडी भक्कम आहे,” असं राऊत म्हणाले,. तसंच एका वैफल्यातून, निराशेतून असे भोंगे वाजत आहेत असंही ते म्हणाले. भाजपाने आमच्याविरोघात भोंगे वाजवले त्याचा फायदा झाला नाही म्हणून नवीन भोंगे लावलेत असा टोला यावेळी त्यांनी लगावला.