मुंबई : पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम हीच ओळख असलेल्या देशभरातील महाविद्यालयांना आता कमी कालावधीचे कौशल्य विकास प्रमाणपत्र अभ्यासक्रमही सुरू करता येणार आहेत. हे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचे श्रेयांक हे पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमांसाठीही वापरता येणार आहेत.

पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे, पदविकेचे शिक्षण देणाऱ्या संस्था अशी महाविद्यालयांची ओळख आहे. छोटय़ा कालावधीचे, रोजगारभिमुख, कौशल्य विकसित करणारे अभ्यासक्रम हे प्रामुख्याने महाविद्यालयाची ओळख नसलेल्या खासगी संस्था चालवतात. त्यांना कौशल्य विकास विकास महामंडळाच्या आखत्यारित आणण्यात आले. आता त्याला समांतर यंत्रणा महाविद्यालये उभी करू शकणार आहेत. महाविद्यालयांना तीन ते सहा महिने कालावधीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची मुभा विद्यापीठ अनुदान आयोगाने दिली आहे. आयोगाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. हे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचे श्रेयांकही मिळणार असून ते श्रेयांक पेढीत जमा होणार आहेत. मिळालेले श्रेयांक विद्यार्थी अनुषंगिक प्रमाणात पदवी किंना पदविका अभ्यासक्रमासाठी वापरू शकतील.

हेही वाचा >>>महिला डॉक्टरची अश्लील चित्रफीत तयार करणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक

कोणते अभ्यासक्रम सुरू करता येणार?

कृत्रिम प्रज्ञा, मशिन लर्निग, आयओटी, विदा विज्ञान, क्लाऊड कॉम्प्युटिंग, सायबर सुरक्षा, डिजिटल फॉरेन्सिक, व्हच्र्युअल रिअूलिटी, ५जी कनेक्टिव्हीटी, डिजिटल फ्लुएन्सी, इंडस्ट्रीअल ऑटोमेशन, इलेक्र्टॉनिक सिस्टीम डिझाईन, बेसिक कोिडग इन कॉम्प्युटर लॅन्ग्वेज, कॉम्प्युटर एडेड डिझाईन,  आहारशास्त्र, व्यायामशास्त्र, फायनान्शिअल टेक्नॉलॉजी, फॅशन टेक्नॉलॉजी, फॅशन डिझायिनग, योगविज्ञान, सॉफ्ट स्किल्स, बेसिक ऑफ स्टार्टअप, व्यवस्थापन, सोहळा व्यवस्थापन, विपणन याशिवाय संस्था विद्यार्थ्यांना मिळणारे ज्ञान आणि बाजारपेठेची गरज यातील तफावत लक्षात घेऊन वेगळे अभ्यासक्रम सुरू करू शकतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका तुकडीत ६० विद्यार्थ्यांना प्रवेश

महाविद्यालये स्वतंत्रपणे किंवा कौशल्य विकास अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्था, उद्योग यांच्याशी करार करून हे अभ्यासक्रम सुरू करू शकतील. महाविद्यालय स्वतच्या किंवा संस्थेच्या नावाने प्रमाणपत्र देऊ शकेल. तसेच अभ्यासक्रमाचा आराखडा, रचना तयार करण्याचे स्वातंत्र्यही महाविद्यालयांना मिळेल. अभ्यासक्रम सुरू करण्यासाठीची आर्थिक तरतूद मात्र महाविद्यालयांनी स्वतच्या वळाबर करायची आहे. या अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करावा लागेत. एका तुकडीत ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल. तसेच दर ३० विद्यार्थ्यांमागे एक प्रशिक्षक असावा अशी अट घालण्यात आली आहे.