scorecardresearch

Premium

महिला डॉक्टरची अश्लील चित्रफीत तयार करणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक

अशोक गुप्ता (वय २८) असे या आरोपीचे नाव असून तो रुग्णालयात सफाई कर्मचारी आहे.

who made obscene tapes, obscene tapes of female doctor
महिला डॉक्टरची अश्लील चित्रफीत तयार करणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक (संग्रहित छायाचित्र)

मुंबई: रुग्णालयात निवासी महिला डॉक्टरची रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्याने अश्लील चित्रफीत तयार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी महापालिकेच्या एका रुग्णालयात घडली असून याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

हेही वाचा : रशियन पोलिसांनी मुलाला बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतल्याचा आरोप

texas illegal trading
पत्नीचे कार्यालयीन कॉल ऐकून पतीने शेअर बाजारात कमावले १४ कोटी; भांडाफोड झाल्यावर बसला धक्का
Medical robotics machine purchase controversy Petition to the High Court
मेडिकलमधील रोबोटिक्स यंत्र खरेदी वादात, उच्च न्यायालयात याचिका
PF interest rate
आनंदाची बातमी : पीएफ व्याजदर ८.२५ टक्क्यांवर, देशभरातील ६.८ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा
student and his father brutally beaten up by two men in kalyan
Kalyan Crime: कल्याणमध्ये विद्यार्थ्याला बेदम मारहाण

अशोक गुप्ता (वय २८) असे या आरोपीचे नाव असून तो रुग्णालयात सफाई कर्मचारी आहे. रविवारी सकाळी आरोपी सफाईच्या निमित्ताने याच रुग्णालयात निवासी महिला डॉक्टरच्या खोलीत गेला होता. त्यावेळी महिला डॉक्टर अंघोळ करत असताना आरोपीने स्वछतागृहाच्या खिडकीतून महिलेचे अश्लील चित्रण करण्याचा प्रयत्न केला. महिला डॉक्टरच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तिने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In mumbai employee who made obscene tapes of a female doctor arrested mumbai print news css

First published on: 07-12-2023 at 21:29 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×