शनिवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुर्ला आणि शीव स्थानकादरम्यान अप मार्गावर रूळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.
ऐन गर्दीच्या वेळेस मध्य रेल्वेवरील शीव आणि कुर्ला स्थानकादरम्यान रूळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या गतीच्या मार्गावरील रूळाला तडे गेल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. सध्या ट्रॅकच्या दुरूस्तीचे काम सुरू असून कुर्ला स्थानकापासून धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. दरम्यान, गाड्या अतिशय धीम्या गतीने पुढे सरकत असून प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मध्य रेल्वेवर सतत अशा घटना घडत असल्यामुळे प्रवासीही संताप व्यक्त करत आहे.