वसई रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर प्रवाशांच्या भारामुळे स्लॅब कोसळला आणि प्रवासी गटारात पडल्याची घटना घडली. दुर्घटनेत १५ प्रवासी जखमी झाल्याचे समजते. लोअर परेल स्थानकाजवळ एक्स्प्रेस गाडीचा डबा घसरल्याने पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे वसई रेल्वे स्थानकावर देखील प्रवाशांची गर्दी झाली होती. प्रवासी प्लॅटफॉर्मवर बाहेरुन जाणाऱया जिन्यावर चढत असताना शिड्या कोसळून हा अपघात घडला. संपूर्ण स्लॅब खाली कोसळला आणि प्रवासी खालील असलेल्या मोठ्या गटारात पडले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झालेली नसून, १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 31st May 2016 रोजी प्रकाशित
वसई रेल्वे स्थानकात स्लॅब कोसळून १५ प्रवासी गटारात पडून जखमी
दुर्घटनेत १५ प्रवासी जखमी झाल्याचे समजते
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड

First published on: 31-05-2016 at 11:46 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Slab collapsed in vasai railway station