आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी मंगळवारी बॉलिवूडमधील अभिनेता विंदू रंधवा याला अटक केली. दिवंगत अभिनेते दारासिंग यांचा तो मुलगा आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
विंदू बुकींच्या संपर्कात असल्याचे तपासात आढळल्यानंतर त्याची सोमवारी चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी दुपारी त्याला अटक करण्यात आली. बिग बॉसच्या तिसऱया सिझनचा विजेता असलेला विंदू हा आयपीएलच्या विविध सामन्यांमध्ये मान्यवरांसाठी राखीव असलेल्या कक्षामध्ये दिसला होता. सामने झाल्यानंतर होणाऱया पार्टीमध्येही विंदू सहभागी होत होता. विंदूच्या अटकेमुळे स्पॉट फिक्सिंगची पाळेमुळे बॉलिवूडपर्यंत पोहोचली असल्याचे उघड झाले आहे.
दिल्ली पोलिसांनी गेल्या गुरुवारी स्पॉट फिक्सिंगप्रकरणी आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सचे क्रिकेटपटू एस. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांच्यासह चार माजी क्रिकेटपटू आणि ११ बुकींना अटक केली होती. त्यानंतर सोमवारी रात्री माजी रणजीपटू बाबूराव यादव याला अटक करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st May 2013 रोजी प्रकाशित
स्पॉट फिक्सिंग: अभिनेता विंदू दारा सिंगला अटक; 3 दिवसांची पोलिस कोठडी
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी मंगळवारी बॉलिवूडमधील अभिनेता विंदू रंधवा याला अटक केली.
First published on: 21-05-2013 at 04:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spot fixing bollywood actor vindoo randhawa son of late actor dara singh arrested