राज्य गुप्तचर यंत्रणेचा सहभाग; इस्लामिक दहशतवाद्यांकडून हल्लाची शक्यता

मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि परिसरातील पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला, तर त्याला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणा किती सज्ज आहेत, त्याची पाहणी करण्यासाठी रविवारी विमानतळ परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘मॉक ड्रिल’ घेण्यात आले.

pune airport latest marathi news
पुणे ठरले उणे! आंतरराष्ट्रीय उड्डाणात छोट्या शहरांनीही टाकले मागे; जाणून घ्या स्थान…
mexico cuts ties with ecuador diplomatic tension between ecuador and mexico after embassy raid
इक्वेडोरचा निषेध पुरेसा आहे?
JAY SHANKAR
अन्वयार्थ: हे मुत्सद्दी की प्रचारकच!
Ecuadorian police break the Mexican embassy and arrested former vice president of Ecuador Jorge Glas
इक्वेडोरकडून आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन; लॅटिन अमेरिकेतील राष्ट्रे संतापली…

मुंबईसह देशातील प्रमुख शहरातील विमानतळ आणि परिसरातील पंचतारांकित हॉटेल्सवर इस्लामिक दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याची खबर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्या पाश्र्वभूमीवर हे ‘मॉक ड्रिल’ घेण्यात आले.

केंद्र आणि राज्य गुप्तचर यंत्रणा आणि अन्य संबंधित यंत्रणांचा यात सहभाग होता.

रविवारी पहाटे झालेल्या या मॉक ड्रिलमध्ये फोर्स वन, राष्ट्रीय सुरक्षा दल, मुंबई पोलीस दलाचे शीघ्र कृती दल आदी यंत्रणा सहभागी झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी ठाणे जिल्ह्य़ातून नझिम अहमद या संशयिताला अटक केली होती. महाराष्ट्रात घातपाती कारवाया करण्याच्या टोळीचा तो म्होरक्या असल्याचा तसेच महाराष्ट्रात घातपाती कारवाया करण्यासाठी दहशतवादी जमा करण्याचा आरोप त्याच्यावर आहे.

मुंबई दहशतवाद्यांचे लक्ष्य

मुंबई शहर इस्लामिक दहशतवाद्यांचे लक्ष्य असून गेल्या काही आठवडय़ांत पाकिस्तान, अफगाणिस्तान येथून काही नागरिक वारंवार मुंबईत येऊन गेले असल्याचे आढळून आले. या मंडळींनी बराच काळ पंचतारांकित हॉटेल्समध्ये वास्तव्य केल्याचेही समोर आले होते. यातूनच आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील एखाद्या पंचतारांकित हॉटेलवर हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांकडून वर्तविण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक पोलीस आणि केंद्र व राज्य गुप्तचर यंत्रणेच्या सहकार्यातून ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.