मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवार, ३ डिसेंबर रोजी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्गिका आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा – मध्य रेल्वेवर लोकलचा खोळंबा

Megablock, Central Railway,
रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
Mega block on Sunday on Western Railway
मुंबई : पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
Change in train schedule due to night block at Vikhroli
विक्रोळीतील रात्रकालीन ब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

कुठे : माटुंगा-मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – ठाणेदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येईल. यावेळी माटुंगा – मुलुंडदरम्यान सर्व स्थानकांवर लोकल थांबा असेल. ठाण्यानंतर सर्व डाऊन जलद लोकल आणि माटुंगानंतर सर्व अप जलद लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हेही वाचा – मुंबई : प्राणवायू निर्मिती प्रकल्प गैरव्यवहाराप्रकरणी ईडीकडूनही गुन्हा दाखल

हार्बर मार्ग

कुठे : सीएसएमटी – चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन लोकल, सीएसएमटी – वाशी/बेलापूर/पनवेल अप आणि डाऊन लोकल, सीएसएमटी – वांद्रे/गोरेगाव अप आणि डाऊन लोकल फेऱ्या बंद राहतील. तर प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्लादरम्यान २० मिनिटांच्या अंतराने विशेष लोकल सेवा चालवल्या जातील.