अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआयची विशेष टीम करत आहे. सध्या या तपासकार्याला वेग आला असून नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आतापर्यंत या प्रकरणी सिद्धार्थ पिथानी, सुशांतचे स्वयंपाकी, मित्र दिपेश सावंत यांची चौकशी करण्यात आली आहे. यातच सुशांतच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने धक्कादायक खुलासा केला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, ‘सुशांतच्या घरी १३ तारखेला कोणतीही पार्टी झाली नव्हती आणि पहिल्यांदाच त्याच्या घराचे लाईट्सदेखील बंद होते’, असं या महिलेने सांगितलं आहे.

“१३ तारखेला रात्री साधारणपणे १०.३० ते ११ च्या दरम्यान सुशांतच्या घराचे लाईट्स अचानक बंद झाले होते. खरं तर असं यापूर्वी कधी झालं नव्हतं. तो रात्री उशीरापर्यंत जागा असायचा. पण त्या रात्री स्वयंपाक घरातील लाइट सोडून सगळ्या घरातील लाइट्स बंद होते”, असं या महिलेने सांगितलं.

वाचा : सुशांत सिंह मृत्यूप्रकरण : ‘आतून आवाज आला तर काम थांबव’; चावीवाल्याने केला धक्कादायक खुलासा

पुढे त्या म्हणतात, “त्या दिवशी सुशांतच्या घरी कोणतीच पार्टी झाली नव्हती. सुशांतच्या घरी १३ तारखेला पार्टी होती अशी चर्चा सुरु आहे. मात्र, प्रत्यक्षात तसं काहीच नव्हतं. सुशांतच्या घरी कोणतीच पार्टी वगैरे नव्हती. या सगळ्या अफवा आहेत”.

वाचा : शवगृहात सुशांतचा मृतदेह पाहून रियाने उद्गारले ‘हे’ तीन शब्द; नवा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सीबीआयची १० सदस्यीय टीम गुरुवारी रात्री मुंबईत दाखल झाली. पोलीस अधीक्षक नुपूर प्रसाद यांच्या नेतृत्त्वाखाली टीम तपास करत आहे. सीबीआय टीमकडून सुशांतच्या स्टाफ कर्मचाऱ्याची चौकशी करण्यात आली आहे. याशिवाय मुंबई पोलिसांकडून सर्व कागदपत्रं घेतली आहेत. यामध्ये सुशांत सिंहचा शवविच्छेदन अहवालाचाही समावेश आहे.