लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : खटुआ समितीच्या शिफारशींचे कारण देत मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा संघटना पुन्हा एकदा भाडेवाढीसाठी दबाव टाकत आहेत. सध्याचे किमान टॅक्सी भाडे २८ रुपये आणि रिक्षा भाडे २३ रुपये असून हे भाडे कमी असल्याचे सांगत आता यात अनुक्रमे ४ रुपये आणि २ रुपये प्रतिकिमीने भाडेवाढ करण्याचे संघटनांनी ठरवले आहे.

Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Navi Mumbai Municipal Corporation
३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर भरण्याचे नवी मुंबई महापालिकेचे आवाहन
Thane Police Department Applications are invited For Police Constable and Driver Candidates Till Thirty First March
Thane Police Bharti 2024 : पोलीस विभागात नोकरी करण्याची संधी! बारावी उत्तीर्ण करू शकतात अर्ज, जाणून घ्या सविस्तर
supreme court
तथ्यशोधन कक्षाबाबतच्या अधिसूचनेला स्थगिती

करोनाकाळात झालेले नुकसान भरून निघाले नाही. तसेच रिक्षा-टॅक्सी यांची देखभाल-दुरुस्तीचा खर्च अवाच्या सवा वाढला आहे. यासह इंधन दराच्या किमत काही कमी झाल्या नाहीत. त्यामुळे खटुआ समितीच्या शिफारशीच्या आधारे ही भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव संघटनेकडून परिवहन विभागाला पाठवण्यात येणार आहे. ऑक्टोबर २०२२ रोजी रिक्षाच्या दरात २१ रुपयांवरून २३ रुपये केले. तर, टॅक्सीच्या दरात २५ रुपयांवरून २८ रुपये केले होते.

आणखी वाचा-धर्मादाय आयुक्तालतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवडणूक कामांतून तूर्त सुटका

टॅक्सीचे ४, तर रिक्षाचे २ रुपये करण्याची मागणी

सोमवारी परिवहन आयुक्तांची भेट घेऊन टॅक्सी आणि रिक्षा भाडेवाढ करण्याचे पत्र लिहिणार आहोत. सध्या टॅक्सी भाडे २८ रुपये असून ते ३२ रुपये आणि रिक्षा भाडे २३ रुपये असून २५ रुपये करण्याचे ठरवले आहे. -ए. एल. क्वाड्रोस, मुंबई टॅक्सीमेन्स युनियन