मेट्रो २ अ’ (दहिसर – डी. एन. नगर) आणि ‘मेट्रो ७’ (दहिसर – अंधेरी) मार्गिकेचा दुसरा टप्पा अखेर दृष्टीक्षेपात आला आहे. या टप्प्यातील महत्त्वाच्या अशा चाचण्या ‘रिसर्च डिझाइन ॲण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन’ने (आरडीएसओ) पूर्ण केल्या असून आता सिग्नल यंत्रणेच्या चाचण्यांना सुरुवात करण्यात आली आहे. आता ‘आरडीएसओ’कडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मेट्रो आयुक्तांना मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणापत्र घ्यावे लागणार आहे. त्यानंतर दुसरा टप्पा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल.

हेही वाचा- बेकायदा फलकबाजी करणाऱ्यांवर दंड आकारा; शासकीय समितीची सरकारकडे शिफारस

‘मेट्रो अ’ आणि ‘मेट्रो ७’चा दहिसर ते आरे असा एकूण २० किमीचा टप्पा एप्रिलमध्ये सेवेत दाखल झाला. हा टप्पा सुरू करतानाच ‘मेट्रो २ अ’मधील डहाणूकरवाडी ते डी. एन. नगर आणि ‘मेट्रो ७’मधील आरे ते अंधेरी पूर्व असा दुसरा टप्पा १५ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात येईल असे एमएमआरडीएकडून जाहीर करण्यात आले होते. पण काम पूर्ण होण्यास विलंब झाल्याने हा मुहूर्त चुकला. आता यासाठी डिसेंबरचा नवा मुहूर्त धरण्यात आला आहे. त्यानुसार कामाला वेग देण्यात आला असून बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे आवश्यक त्या विविध चाचण्या करण्यात येत असून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा- आषाढी एकादशी, गणेशोत्सवासाठी सोडलेल्या जादा बसगाड्यांमुळे एसटीने केली ३६ कोटी रुपयांची कमाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रक्रियेनुसार आतापर्यंत ऑसिलेशन आणि आरडीएसओच्या चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. आता सिग्नल यंत्रणेच्या चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे दुसरा टप्पा दृ्टीक्षेपात आल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.