मुंबई: उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर दादर येथील सिद्धीविनायक मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार असून यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. लवकरच मंदिर विकासाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 

प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्याकरीता मुंबई महानगरपालिकेने विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत सिद्धीविनायक मंदिर परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार असून मंदिर परिसराचे पुनर्नियोजनही करण्यात येणार आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण, सुशोभिकरण, पूजा साहित्य विक्रेत्यांची व्यवस्था अशा कामांचा यात समावेश आहे.  या कामाचा विस्तृत प्रकल्प अहवाल ( डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट)  तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सागरी किनारा मार्गाच्या एका मार्गिकेच्या लोकार्पण कार्यक्रमात या प्रकल्पाची घोषणा केली.

Mumbai, Patrachal Redevelopment Project, Siddharth Nagar, Set for Completion, by May, Patrachal case, goregaon, Patrachal news, goregaon news, mumbai news, marathi news,
पत्राचाळीतील पुनर्वसित इमारतीचे ८५ टक्के काम पूर्ण, मेअखेरीस काम पूर्ण करण्याचे म्हाडाचे नियोजन
raj kundra properties
ईडीकडून शिल्पा शेट्टीच्या पतीची संपत्ती जप्त; कथित ६६०० कोटींची बिटकॉइन फसवणूक काय?
Traffic restrictions in Muktidham Kalaram Mandir area on the occasion of Ram Navami
रामनवमीनिमित्त मुक्तीधाम, काळाराम मंदिर परिसरात वाहतुकीवर निर्बंध
Northwest Mumbai beautification of Jogeshwari Caves is sometimes under construction awaiting rehabilitation
आमचा प्रश्न : वायव्य मुंबई – जोगेश्वरी गुंफेचे सुशोभीकरण कधी प्रकल्पबाधितही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

हेही वाचा >>>बोरिवलीत इमारतीची परांची कोसळली; तीन जण ठार, एक जखमी

सागरी किनारा मार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमात खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबतचे पत्र दिले व सिद्धीविनायक मंदिराच्या सुशोभिकरणाच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात ही घोषणा केली.

प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिर हे भारतातील प्रमुख देवस्थानांपैकी एक आहे. या मंदिरात जगभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती, अभिनेते, अभिनेत्री, उद्योजक सिद्धीविनायकाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. मात्र अत्यंत गजबजलेल्या या परिसरात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे मंदिर परिसराचा कायापालट करण्याचा प्रकल्प पालिका प्रशासनाने हाती घेतला आहे.  प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात येणार आहे.

प्रकल्पामध्ये या गोष्टींचा समावेश

– मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र येण्या-जाण्यासाठी रस्ता तयार करणे

– मंदिराच्या दोन्ही मार्गावर प्रवेशद्वार बनवणे

– भाविकांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह बनवणे

– दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना छतासह तात्पुरती आसन व्यवस्था करणे

– मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण करणे

– भाविकांसाठी वाहनतळाची व्यवस्था करणे

– सुरक्षिततेसंबंधी उपाययोजना करणे

– नवीन मेट्रो स्थानकापासून मंदिराकडे येणाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करणे

– दादर स्थानकापासून मंदिराकडे येण्यासाठी दर पाच मिनिटांनी बेस्टची मिनीबस चालवणे