राज्यातील मतदारांची संख्या आठ कोटींच्या घरात गेली असून, नोंदणी मोहिमेत ४० लाख नावे वाढली आहेत. राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या विरोधानंतरही सुमारे १४ लाख नावे मतदार याद्यांमधून वगळण्यात आली. मतदार याद्यांमधून नावे वगळण्याची मोहिम निवडणूक विभागाने हाती घेतली तेव्हा सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये प्रतिक्रिया उमटली होती. तरीही १३ लाख, ४९ हजार नावे वगळण्यात आली. राज्यात चार कोटी, १८ लाख पुरुष तर ३ कोटी, ७१ लाख महिला मतदारांची नोंदणी झाली आहे.
मीरा-भाईंदर, जळगावमध्ये सर्वाधिक नावे वगळली
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक ६७ हजार नावे वगळण्यात आली आहेत. मीरा-भाईंदर (५३ हजार), नालासोपारा (४६ हजार), भिवंडी पूर्व (२७ हजार), गणेश नाईक यांच्या बेलापूर मतदारसंघातील १४ हजार नावे वगळण्यात आली आहेत. मुंबईत धारावी (४० हजार), सायन-कोळीवाडा (३४ हजार), वडाळा (१६ हजार), वरळी (१८ हजार), शिवडी (१२ हजार), कुलाबा (२५ हजार), कोल्हापूर उत्तर (२६ हजार) तर इचलकरंजीमध्ये २५ हजार नावे वगळण्यात आली आहेत.
मुंबईत ९६ लाख मतदार
जिल्हानिहाय मतदारांची आकडेवारी – नंदुरबार (१० लाख, ६६ हजार), धुळे (२९ लाख), जळगाव (१८ लाख), बुलढाणा (१३लाख, ६० हजार), अकोला (नऊ लाख), अमरावती (२१ लाख), वर्धा (११ लाख), नागपूर (३५ लाख), भंडारा (नऊ लाख), गोंदिया (सात लाख), गडचिरोली (१० लाख), चंद्रपूर (१६ लाख), यवतमाळ (१९ लाख), नांदेड (२४ लाख), हिंगोली (आठ लाख), परभणी (१२ लाख), जालना (१३ लाख), औरंगाबाद (२३ लाख), नाशिक (३८ लाख), ठाणे (७१ लाख), मुंबई उपनगर (७३ लाख), मुंबई शहर (२३ लाख), रायगड (१९ लाख), पुणे (६३ लाख), नगर (३१ लाख), बीड (१८ लाख), लातूर (१६ लाख), उस्मानाबाद (तीन लाख), सोलापूर (२३ लाख), सातारा (१२ लाख), रत्नागिरी (१२ लाख), सिंधुदुर्ग (सहा लाख), कोल्हापूर (२८ लाख), सांगली (२१ लाख).