मुंबई: भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाचे अंधेरी- जुहू भागातील दोन्ही रडार अन्यत्र स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आली असून येत्या सहा- आठ महिन्यात रडार स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण होईल. तसेच फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्वसनासाठी वाढीव विकास हस्तांतरण हक्क(टीडीआर)देण्याबाबतही सरकार विचार करीत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

अंधेरीमधील डीएन नगर येथे विमानतळ प्राधिकरणाच्या जमीनीवरील दोन रडारमुळे या परिसरात इमारतींच्या उंचीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. याबाबत अमित साटम, पराग आळवणी, मनिषा चौधरी आदी सदस्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावर बोलताना शिंदे यांनी विमान प्राधिकरणाचे दोन्ही रडार मढ आणि गोराई येथे स्थलांतरीत करण्यात येणार असून त्यासाठी जागा आणि निधी देण्याची तयारी राज्य सरकारने दाखविली आहे.

तसेच याबाबत लवकर निर्णय घेण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात आली असून केंद्र सरकारही सकारात्मक असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. हा निर्णय लांबल्यास विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली मध्ये बदल करून या भागातील पुनर्विकास प्रकल्पांना ‘फ्लोटिंग एफएसआय’ देण्याचा सकारात्मक विचार केला जाईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचप्रमाणे विमानतळ बाधित क्षेत्रातील(फनेल झोन) इमारतींच्या उंचीवरील निर्बंधामुळे उपनगरातील शेतडो इमारतींच्या पुनर्विकास रखडला आहे. या ठिकाणी इमारतींच्या उंचीवरील निर्बंध लक्षात घेता पुनर्विकास प्रकल्प सुसाध्य होण्यासाठी विविध सवलतींसोबतच वाढीव विकास हस्तांतरण हक्क देण्याबाबाबतची विचार केला जात आहे. याबाबत मुंबईतील आमदारांची बैठक घेऊन तसेच विविध पर्यायांचा अभ्यास करुन अंतिम निर्णय घेतला जाईल असे शिंदे यांनी वरुण सरदेसाई यांच्या प्र्श्नाला उत्तर देतांना सांगितले.