काल गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे आगमन होते तोच आज दीड दिवसाच्या गणरायांना निरोप देण्यात येणार आहे. या विसर्जन सोहळ्यासाठी बृहन्‍मुंबई महापालिकेने चौपाट्यांबरोबरच अनेक गणेश विसर्जन स्‍थळांवर वेगवेगळ्या सुविधा पुरवल्या आहेत. विजसर्नाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना वाहतूक व्यवस्थेमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. या संदर्भातील माहिती त्यांनी ट्विटवरून दिली आहे.

दोन वेगवेगळ्या ट्विटमध्ये नकाशांच्या माध्यमातून पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेसंदर्भातील अपडेट्स विसर्जनासाठी जाणाऱ्या भक्तांना दिल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये जुहू चौपाटी, वर्सोवा चौपाटी आणि मध्य तसेच दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्थेमधील बदलांबद्दलची माहिती देण्यात आली आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी गिरगाव चौपाटी, पवई तलाव आणि कुर्ल्यातील शीतल तलाव परिसरातील वाहतूक व्यवस्थेसंदर्भातील माहिती नकाशांच्या माध्यमातून दिली आहे.

जुहू चौपाटी, वर्सोवा चौपाटी आणि मध्य तसेच दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्था

दक्षिण मुंबई[/caption] वर्सोवा चौपाटी
मध्य मुंबई

गिरगाव चौपाटी, पवई तलाव आणि शीतल तलाव परिसरातील वाहतूक व्यवस्था

गिरगाव चौपाटी
पवई तलाव
शीतल तलाव

एकूण विसर्जन स्‍थळे

नैसर्गिक विसर्जन स्‍थळे – ६९
कृत्रिम विसर्जन स्‍थळे – ३१

पालिकेकडून विसर्जन स्थळी पुरवण्यात आलेल्या सोयी

८४० स्‍टील प्‍लेट, ५८ नियंत्रण कक्ष, ६०७ जीवरक्षक, ८१ मोटरबोट, ७४ प्रथमोपचार केंद्रे, ६० रुग्णवाहिका, ८७ स्‍वागत कक्ष, ११८ तात्‍पुरती शौचालये, २०१ निर्माल्‍य कलश, १९२ निर्माल्‍य वाहन/डंपर, १ हजार ९९१ फ्लड लाइट, १ हजार ३०६ सर्च लाइट, ४८ निरीक्षण मनोरे, ५० जर्मन तराफे याची सोय करण्यात आली आहे.

ऑन ड्युटी किती जण

६ हजार १८७ कामगार- कर्मचारी
२ हजार ४१७ अधिकारी

क्रेन्सही तैनात

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासहित मनुष्यबळाची व्यवस्था तसेच नियंत्रण कक्षामध्ये निष्णात डॉक्टरांसहित सुसज्ज रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश विसर्जन सुरळीत पार पडण्यासाठी टोइंग वाहने, क्रेन्स, जे. सी. बी. मशीन्स, बुलडोझर इत्यादी यंत्रसामग्रीदेखील विसर्जनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत तैनात करण्यात आली आहे.

विसर्जनाचा आकडा वाढणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या वर्षी नैसर्गिक जलस्त्रोतांमध्‍ये ११ हजार ०९८ सार्वजनिक मूर्ती विसर्जित करण्यात आल्या होत्या, तर १ लाख ९१ हजार २५४ घरगुती गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आल्या होत्या. कृत्रिम तलावांमध्‍ये सार्वजनिक ६५२, तर घरगुती २८ हजार ६३१ गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आल्या होत्या. यंदा या संख्येत वाढ होईल, अशी अपेक्षा महापालिकेतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.