विधानसभेमध्ये पदवीवरुन गदारोळ करणाऱ्या विरोधकांना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी जोरदार उत्तर दिले. पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील श्रीमंत होते, त्यांच्याकडे पैसा होता म्हणूनच त्यांना ते विदेशात उच्च शिक्षण देऊ शकले. मात्र, आमचे कुटुंब मध्यमवर्गीय होते. माझे वडील हे म्हाडामधील कर्मचारी होते. त्यामुळे आमच्यासारखे गरीब विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वर विद्यापीठातून शिक्षण घेतले. आमच्याकडे जर पैसा असता, तर आम्हीही तुमच्यासारखे विदेशात शिक्षण घेऊ शकलो असतो. आम्ही ज्या ज्ञानेश्वर विद्यापीठात शिकलो, त्या विद्यापीठाची थट्टा करुन एका अर्थाने तुम्ही गरीब विद्यार्थ्यांची थट्टा करीत आहात, ही संस्कृती तुम्हाला शोभते का ? असा सवाल विनोद तावडे यांनी केला. गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊच नये, हीच तुमची भावना दिसत असल्याचा टोलाही तावडे यांनी मारला.