माहिम येथील गिरगावकर वाडी येथे पुनर्विकासाच्या वादातून एका रहिवाशाकडून दहा हजार रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी माहिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलीस तीन फरार व्यक्तींचा शोध घेत आहेत. माहिमच्या सितलादेवी मंदिराजवळ असलेल्या न्यू गिरगावकर वाडीचा पुनर्विकास प्रस्तावित आहे. काही जणांचा पुनर्विकास प्रकल्पाला विरोध असून त्यावरुन गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. ११ डिसेंबर रोजी या ठिकाणी संतोष नाई, साबन्ना सडक आणि अश्रफ शेख या तीनजणांनी वाडीतील राकेश काकी यांना रस्त्यात गाठून रिव्हॉल्वरच्या धाकाने धमकावले. आम्ही अश्विन नाईकची माणसे असून बिल्डरकडे जाऊन सह्य़ा करण्याची धमकी या तिघांनी राकेश यांना देऊन पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितली.