मुंबई : जाहिरातीच्या कामाचे १० कोटी रुपये थकविल्यानंतर तीन सदनिकांचे ताबापत्र देऊन त्यांची परस्पर विक्री करून एका व्यवसायिकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ललित धर्मानी, अमित वाधवानी व विकी वाधवानी यांना अटक केली.

बोरिवलीमधील ६१ वर्षीय तक्रारदारांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी मे २०१७ ते ऑक्टोबर २०२३ यादरम्यान व्यावसायिकाची फसवणूक केली. आरोपी अमित वाधवानी, विकी वाधवानी, ललीत धर्मानी आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीने संगनमत करून साई ईस्टेट कन्सलटन्ट चेंबूर प्रा. लि. आणि ॲव्ह – स्टक इंटिग्रेट टेक्नॉलॉजिस प्रा. लि. बफरिंग कंपनीसाठी होर्डिंग जाहिरातीच्या कामाचे एकूण १० कोटी एक लाख ९० हजार ७९३ रुपये थकवले. थकलेल्या रकमेच्या बदल्यात आरोपींनी त्यांना तीन सदनिकांचे ताबापत्र, भोगवटा प्रमाणपत्र दिले. भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सदनिकांची विक्री करार करून ताबा देण्याचे आमीष दाखविले. मात्र आरोपींनी या सदनिकांची परस्पर विक्री करून आपली फसवणूक केली. थकीत पैशांची मागणी केली असता आरोपींनी मारहाण करून धमकावल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे
Ola Uber Pune
ओला, उबरवरील कारवाईला ‘ब्रेक’! आरटीओचे एक पाऊल मागे; कारण काय…
Details of election bonds held by pharmaceutical companies Worrying
लेख: रोखे घेऊन औषध कंपन्या तंदुरुस्त!