शाळांना उन्हाळी सुट्टी असल्याने कोपरखरणे सेक्टर सहा येथे राहणारे चार शाळकरी मित्र कोपरखैरणे सेक्टर १९ येथील गणपती विसर्जन तलावात मासे पकडण्यासाठी गेले होते. पण तीन जणांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अक्षय भोर (१३), आदित्य गुप्ता (१०), ओमकार हिलाने (१३) अशी त्यांची नांवे आहेत. या वेळी आदित्य व ओमकार हे पाण्यामध्ये मासे पकडण्यासाठी तलावामध्ये उतरले असता ते बुडत असल्याचे पाहून अक्षय हा त्यांना वाचवण्यासाठी तलावामध्ये उतरला. पण हे तिघेही बुडत असल्याचे पाहून सागर याने पळत जाऊन आपले वडील राजेशनाथ यांना ही माहिती दिली. मात्र राजेशनाथ हे तेथे पोहोचण्याअगोदर अक्षय, आदित्य व ओमकार या तिघांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला होता. यानंतर त्यानंतर वाशीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या साह्य़ाने शोधमोहीम सुरू करून तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. शनिवारी कोपरखरणे येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jun 2014 रोजी प्रकाशित
तीन शाळकरी मुलांचा कोपरखैरणे येथील तलावात मृत्यू
शाळांना उन्हाळी सुट्टी असल्याने कोपरखरणे सेक्टर सहा येथे राहणारे चार शाळकरी मित्र कोपरखैरणे सेक्टर १९ येथील गणपती विसर्जन तलावात मासे पकडण्यासाठी गेले होते.
First published on: 15-06-2014 at 01:44 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three school children dies in pond