विधानसभेत ‘जादूटोणा’ विधेयक मंजूर झाल्याने जादूटोण्याला आता मूठमाती मिळेल या कल्पनेमुळे राज्यात आनंदाचे वातावरण असले तरीही अंधश्रद्धेमुळे एका महिलेला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. आजारी पत्नी बरी व्हावी यासाठी पतीने एक दुस-या स्त्रीचे तुकडे करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार वसईत घडला आहे. वसईतील वळीव गावात ‘नरबळी’ची ही घटना घडली असून याप्रकरणी मांत्रिकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबर रोजी वळीव गावात एका स्त्रीचा शीरविरहीत मृतदेह सापडला होता. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला होता. त्यानंतर काही दिवसांनी भिवंडी पोलीस स्थानकात एक मुलगा आपली आई हरवल्याची तक्रार घेऊन आला होता. पोलिसांनी त्याला या महिलेचा मृतदेह दाखवला असता काही खुणांच्या आधारे ती महिला आपली आईच असल्याचे त्या मुलाने सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना संबंधित महिलेचा फोन चेक केला तसेच ती शेवटी कोणास भेटली होती याचाही शोध घेतला. त्यानंतर नरबळीचा प्रकार असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Dec 2013 रोजी प्रकाशित
पत्नीला वाचवण्यासाठी केली दुस-या स्रीची हत्या
आजारी पत्नी बरी व्हावी यासाठी पतीने एक दुस-या स्त्रीचे तुकडे करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार वसईत घडला आहे.

First published on: 14-12-2013 at 03:30 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To save wifes life husband killed anothwer woman