मुंबई : टोरेस गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने नऊ परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावली आहे. त्यात आठ युक्रेनचे व एक तुर्कस्थानचा नागरिक आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपीने २०० कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय आहे. टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी पसार झालेला तौसिफ रियाज उर्फ जॉन कार्टर याचा अद्याप पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही. या प्रकरणाचा गुंता सोडविण्यासाठी तौफिक सापडणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत असून तो कुठे दिल्यास संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे.

एखाद्या गुन्ह्याच्या तपासात महत्त्वाच्या व्यक्तीबद्दलची माहिती, तिची ओळख पटवणे आणि ती कुठे आहे, शोधणे यासाठी ही नोटीस काढली जाते. इंटरपोलने अशी नोटीस काढल्यानंतर सगळ्या देशांच्या पोलीस आणि तपास यंत्रणांना त्याबद्दलची माहिती दिली जाते. त्यामुळे या यंत्रणा एखाद्या व्यक्तीला शोधून काढण्यासाठी किंवा तिच्या हालचालींबद्दलची माहिती मिळवून देण्यासाठी मदत करतात. त्यासाठी इंटरपोलच्या मदतीने ब्लू कॉर्नर नोटीस बजावण्यात येते. त्यापूर्वी याप्रकरणात आरोपीविरोधात लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते.

Online fraud of Rs 91 thousand on name of insurance
विम्याच्या नावाखाली ९१ हजारांची ऑनलाइन फसवणूक
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
fake ordinance pune news in marathi
पुणे : बनावट अध्यादेश काढून वेतनवाढ मिळवण्याचा प्रयत्न उघड, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल
bombay hc ordered to form special investigation team to investigate financial fraud
७,३०० कोटी रुपयांचे फसवणूक प्रकरण; एसआयटी चौकशीचे उच्च न्यायालयाचे आदेश
torres fraud mumbai news in marathi
टोरेस गैरव्यवहार प्रकरणः आतापर्यंत ११,३०० गुंतवणूकदारांची १२० कोटींची फसवणूक
four arrested including ex corporator swapnil Bandekar in Rs 10 crore extortion case
बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली १० कोटींची खंडणी; माजी नगरसवेक स्वप्निल बांदेकरसह चौघांना अटक
pune college admission fraud
पुणे: महाविद्यालयात प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक, महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
nana patole , reputation , ministers ,
राज्य मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्री कलंकित, पटोलेंचा गंभीर आरोप

हेही वाचा : एसटीच्या कंत्राटी बस निविदा रद्द, नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

थकीत व्याजाची रक्कम हजारो कोटींच्या घरात

टोरेसकडून अनेक गुंतवणूक योजना राबवण्यात आल्या होत्या. त्यात दर आठवड्याला सहा टक्के व्याज देण्याचे आमीष दाखवण्यात आले होते. मुंबई, नवी मुंबई, आणि मीरा रोड येथील हजारो गुंतवणूकदार ६ जानेवारी रोजी टोरेसच्या दादर, मीरा रोड, आणि एपीएमसी नवी मुंबई येथील कार्यालयाबाहेर जमले आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून त्यांचे व्याज थकवले गेल्यामुळे नागरिकांनी आंदोलन केले. त्याच दिवशी शिवाजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही रक्कम हजारो कोटींच्या घरात असल्याचा दावा करण्यात येत आहे. याशिवाय मीरा भाईंदरच्या नवघर पोलीस, ठाण्याच्या राबोडी पोलीस, आणि नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्यातही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडी या सर्व प्रकरणाचा मिळून तपास करणार आहे.

Story img Loader