पार्श्व लाईफ सायन्स कंपनीच्या चौकशीतून उघड

मुंबई : जे.जे. रुग्णालयामध्ये पार्श्व लाईफ सायन्स कंपनीने केलेल्या खासगी औषध कंपन्यांच्या औषधांच्या तपासणीसंदर्भात (क्लिनिकल ट्रायल) सध्या चौकशी सुरू असून, गेल्या सहा वर्षांमध्ये जे.जे. रुग्णालयात जवळपास ३० औषध कंपन्यांच्या औषधांची तपासणी करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी उघडकीस आले आहे. मात्र अनेक औषधांच्या तपासण्यांची नोंद डॉ. हेमंत गुप्ता यांच्या नावावर असल्याने त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

करोना केंद्रातील कथित गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाकलेल्या छाप्यांमध्ये डॉ. हेमंत गुप्ता यांचे नाव समोर आले. त्यानंतर डॉ. हेमंत गुप्ता यांचा संबंध असलेल्या आणि रुग्णालयातील औषधनिर्माण शास्त्र विभागातील तीन कक्षांमध्ये कार्यरत असलेल्या पार्श्व लाईफ सायन्स या खासगी कंपनीची चौकशी करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला. यामध्ये काही डॉक्टरांना मानधन मिळाले नसल्याचे, तर काहींनी मानधनाचा हिशोब रुग्णालय प्रशासनाला दिला नसल्याचे उघडकीस आले आहे. मात्र २०१८ मध्ये पार्श्व लाईफ सायन्स कंपनी आणि जे.जे. रुग्णालयामध्ये करार झाल्यापासून सहा वर्षांमध्ये या कंपनीने अधिकृतरित्या ३० औषध कंपन्यांच्या चाचण्या केल्याचे चौकशीमधून समोर आले आहे. तसेच अनेक चाचण्या डॉ. हेमंत गुप्ता यांच्या नावावर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ३० पेक्षा अधिक औषध कंपन्यांच्या औषधांची चाचणी करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

On the strength of PSU banks the Sensex reached the level of 486 points
पीएसयू बँकांच्या जोरावर सेन्सेक्सची ४८६ अंशांची मुसंडी
The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप
cashless health insurance
‘कॅशलेस’ आरोग्य विम्याला डॉक्टरांचा विरोधच! जाणून घ्या कारणे…

हेही वाचा >>>महाराष्ट्र भूषण’ सोहळय़ातील दुर्घटना: चौकशी समितीस महिनाभर मुदतवाढ

हेही वाचा >>>कौटुंबिक अत्याचाराचे कलम दंडात्मक शिक्षेचे करण्यास न्यायालयाचा नकार; केंद्र सरकारच्या भूमिकेनंतर स्पष्टीकरण

औषधांच्या चाचण्यांबाबत साशंकता

जे.जे. रुग्णालयात काही औषधांच्या चाचण्या न करताच डॉक्टरांनी त्यांना मंजुरी दिल्याचा संशय आहे. तर काही औषधांच्या चाचण्यांमध्ये रुग्णालयातील डॉक्टरांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात संबंधित डॉक्टर त्या चाचण्यांमध्ये सहभागी नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे चाैकशी समितीने औषधांच्या चाचाण्यांवर शंका उपस्थित केली आहे.