मुंबई : शाळेत गेलेल्या १४ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची घटना गुरुवारी घाटकोपर परिसरात घडली आहे. याबाबत मुलींच्या आईने केलेल्या तक्रारीवरून पंतनगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून दोन्ही मुलींचा शोध सुरू केला आहे.

घाटकोपरच्या रमाबाई कॉलनी परिसरात या दोन्ही मुली वास्तव्यास असून परिसरातील एका खासगी शाळेत इयत्ता नववीत त्या शिक्षण घेत होत्या. नेहमीप्रमाणे गुरुवारी दोघीही शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या. मात्र शाळा सुटून बराच वेळ झाल्यानंतर त्या घरी आल्या नाहीत.

हेही वाचा…पंजाबी वसाहतीचा लवकरच पुनर्विकास म्हाडातर्फेच कार्यवाही; विरोधातील विकासकाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे एका मुलीच्या आईने शाळेतील वर्गशिक्षिकेला फोन करून याबाबत विचारणा केली असता, त्या गुरुवारी शाळेत आल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. मुलींच्या आईंनी दोघींच्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर रात्री उशिरा दोन्ही मुलींच्या आई-वडिलांनी पंतनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून या दोन्ही मुलींचा शोध सुरू केला आहे.