मुंबईत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. कांदिवली परिसरातील इमारतीला ही आग लागली आहे. या आगीत होरपळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
कांदिवली परिसरातील संतूर इमारतीला ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा : “पहिल्यांदाच असं काहीतरी घडतंय!”, स्थानकात येताच लोकलचे डबे …; मरिन लाईन्स येथील घटना वाचा
या आगीत ग्लोरी वालफाटी ( ४३ वर्षे ) आणि जोसू जेम्स रॉबर्ट ( ८ वर्षे ) यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तीन जण गंभीर झाले आहे. तिघांना जवळील रूग्णालयात उपचासाठी दाखल करण्यात आलं आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. अग्निशमन दलाचे अधिकारी घटनेचा तपास करत आहेत.