रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर धडकून झालेल्या दुचाकीच्या अपघातात दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चेंबूरच्या सांताक्रुझ – चेंबूर लिंक रोडवर घडली. टिळकनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. चेंबूर परिसरात राहणारे गणेश आरडे (४०) आणि रुपेश पेडणेकर (४०) हे दोघे मित्र काही कामानिमित्त दुचाकीवरून गुरुवारी कुर्ला पश्चिम परिसरात गेले होते.

हेही वाचा >>> आरपीएफने केली १९४ मुलांची घर वापसी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रात्री ८ च्या सुमारास दोघेही सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरून घरी परतत होते. टिळकनगर उड्डाणपुलावर अचानक दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर गाडी आदळली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिक रहिवाशांनी तात्काळ त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. टिळकनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.