मुंबई: विनापरवाना शस्त्र घेऊन फिरणाऱ्या दोन सराईत आरोपींना पंतनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पोलिसांनी या आरोपींकडून एक देशी बनावटीची बंदूक आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत केली.

मुनिष खान (३४) आणि मुकद्दर पठाण (२४) अशी या आरोपींची नावे असून मुनिष धारावीत, तर मुकद्दर उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहे. या आरोपींकडे शस्त्रासाठा असून ते पंतनगर परिसरातील पेट्रोल पंपावर येणार असल्याची माहिती पंतनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास सापळा रचून या आरोपींना ताब्यात घेतले.

हेही वाचा – मुंबईच्या धर्तीवर राज्यातील म्हाडा वसाहतींसाठीही चार चटईक्षेत्रफळ, शासनाकडे चार वर्षांपासून प्रस्ताव प्रलंबित

हेही वाचा – मुंबई सेंट्रलच्या बीआयटी चाळीत पुनर्विकासाचे वारे

यावेळी पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ एक देशी बनावटीची बंदूक आणि तीन जिवंत काडतुसे सापडली. अनधिकृतपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी या दोघांना अटक केली.