मुंबई: ऑनलाइन कामाच्या शोधत असलेल्या दोन महिलांची काही भामट्यांनी पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना मुलुंड येथे घडली. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

नीलम वाघेला (२८) आणि सुनीता अलगुडे (४२) अशी पीडित महिलांची नावे असून त्या मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील रहिवासी आहेत. दोन्ही महिला गृहिणी असून त्या अनेक दिवसांपासून ऑनलाइन कामाच्या शोधात होत्या. सुमारे १५ दिवसांपूर्वी वाघेला यांच्या मोबाइलवर समाजमाध्यमांवरून एक संदेश आला. त्यामध्ये ऑनलाइन नोकरी करून मोठी कमाई करता येईल असे अमिष दाखवले होते. आरोपींनी पहिल्यांदा त्यांना काही काम दिले आणि या कामाचे पैसेही तत्काळ दिले. त्यामुळे महिलेला आरोपींवर विश्वास बसला. त्यानंतर आरोपींनी विविध कारणे देत महिलेला विविध खात्यात पैसे पाठवण्यास सांगितले. काम केल्याची मोठी रक्कम मिळणार असल्याने त्यांनी आरोपींवर विश्वास ठेवला आणि त्यांना पैसे पाठवले. मात्र त्यानंतर आरोपींनी मोठ्या रक्कमेची मागणी केल्याने महिलेने त्यांना नकार दिला.

हेही वाचा – मुंबई : गिरणी कामगार पात्रता निश्चितीच्या विशेष अभियानाला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ

हेही वाचा – बोरिवली स्थानकात तांत्रिक बिघाड, पश्चिम रेल्वे विस्कळीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशाच प्रकारे सुनीता अलगुडे यांचीही फसवणूक करण्यात आली असून दोन्ही महिलांनी याबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याबाबत तत्काळ गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.