राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजपाच्या नेत्यांकडून महाराष्ट्रातील महापुरुषांविरोधात होत असलेली वादग्रस्त विधाने, सीमावादाचा मुद्दा आणि राज्याबाहेर गेलेले प्रकल्प यासह विविध मुद्यांवरून महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. याविरोधात महाविकास आघाडीकडून १७ डिसेंबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आज अजित पवारांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात होती. याबैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषेदत बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे-भाजपावर जोरदार टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Gujarat Election Results 2022 Live: भाजपाला नड्डांचं राज्य टिकवता आलं नाही, अजित पवारांची टीका; वाचा प्रत्येक अपडेट

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“सातत्याने महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अवमान केला जात आहे. महाराष्ट्राचे अस्तित्व नाकारण्यात येत आहे. एका बाजुने महाराष्ट्र तोडण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्राच्या गावांवर आता बाजुच्या राज्यांनी हक्क सांगायला सुरुवात केली आहे. या विरोधात १७ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सुरुवात जिजामाता उद्यानापासून होईल आणि सीएसटीपर्यंत हा मोर्चा असणार आहे. मला खात्री आहे, की आहे की हा मोर्चा न भूतो ना भविष्यते असा होणार आहे”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

हेही वाचा – Himachal Pradesh Election Results 2022 Live : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणाले, “घोडे बाजाराची शक्यता…”

“गेल्या वेळी गुजरात हिमाचल आणि दिल्ली महापालिका या तीन निवडणुका झाल्या, तेव्हा भाजपाने विजय मिळवला होता. मात्र, यंदा हिमाचलमध्ये काँग्रेस, दिल्ली महापालिकेत आप आणि गुजरातमध्ये भाजपाने अभूतपूर्व यश मिळवले आहे. मात्र, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, की गुजरातच्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगाचेही योगदान आहे, हे विसरून चालणार नाही”, अशी टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा – गुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन; म्हणाले, “भाजपाने मिळवलेला विजय…”

“गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ज्याप्रकारे महाराष्ट्रातील उद्योग पळवण्यात आले, त्याप्रकारे कर्नाटकची निवडणूक डोळ्यासमोर घेऊन महाराष्ट्रातील गावंही तोडतील की काय? अशी भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वेळीच महाराष्ट्रद्रोह्यांना आवरले नाही, तर महाराष्ट्र छिन्न-विछिन्न करायलाही हे मागेपुढे बघणार नाही. त्यांच्या मनात जे विष आहे, ते आता जगजाहीर झालं आहे. त्यामुळे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत, त्यांनी १७ तारखेला मोर्चात सहभागी व्हावं” , असे आव्हानही त्यांनी केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray criticized bjp over controversial statement on shivaji maharaj spb
First published on: 08-12-2022 at 18:47 IST