शिवसेनेतील अतभूतपूर्व बंडानंतर उद्धव ठाकरे यांना अनेक पातळीवर संघर्षाचा सामना करावा लागला. दरम्यानच्या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर सुरू केलेला ऐतिहासिक दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाला. आता या वादावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – शिंदे गटाला धक्का! शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास हायकोर्टाकडून परवानगी

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“विजयादशमीच्या दिवशी जो मेळावा होणार आहे. त्यासाठी आपल्याला विजय मिळाला आहे. न्यायदेवतेवर जो आपला विश्वास होता. तो सार्थकी ठरला आहे. मी तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की, दसरा मेळाव्याला उत्साहात, शिस्तीने या, आनंदाला गालबोट लागेल, असं कोणतेही कृत्य होऊ देऊ नका. इतर काय करतील माहिती नाही. या मेळाव्याकडे जगाचे लक्ष लागले आहे,” अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा – Dussehra Melava: उद्धव ठाकरे उभे राहतील तेव्हाच एकनाथ शिंदेही भाषण करणार? शिंदे गट म्हणतो “भाषणाची वेळ…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्याची परवानगी राज्य सरकारची आहे. ही जबाबदारी ते पाडतील, असा मला विश्वास आहे. आजच्या निकालाप्रमाणेच येत्या काही दिवसांत येणारा सर्वोच्च न्यायालयातच्या निकालातूनही आम्हाला न्याय मिळेल. कारण हा निकालही देशातील लोकशाहीचे भवितव्य ठरवणारा निकाल असेल,” असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.