मुंबई : पहलगाम येथील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने राबविलेली ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम संयमपूर्वक आणि योग्यच असल्याचे मत अमेरिकेतील भारतीय वंशाचे पहिले मराठी खासदार डॉ. श्री ठाणेकर यांनी मांडले. ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि भारत-अमेरिका संबंधांवर मुंबई मराठी पत्रकार संघाने विशेष वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
अमेरिका नेहमीच दहशतवादविराेधात उभी राहिली आहे. ९/११ च्या हल्ल्याविरोधातील लढा असो किंवा इस्रायलने दहशतवादाविरोधात हमासवर केलेल्या हल्ला, अमेरिकेने नेहमीच दहशतवादाला विरोध केला आहे. त्यामुळे पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने दिलेले उत्तर हे अमेरिकेला मान्य आहे. पहलगाममधील हल्ला जाणूनबुजून करण्यात आला होता. भारताऐवजी अन्य कोणीही असते तर त्यांनी थेट हल्ला चढवला असता, पण भारताने संयमपूर्वक व विचारपूर्वक भूमिका घेतली आणि फक्त दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यावर भर दिला. भारताने युद्ध पुकारले ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि भारत-अमेरिका संबंधांवर मुंबई मराठी पत्रकार संघाने विशेष वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.नाही, तर सर्जिकल स्ट्राईक केला. पुन्हा दहशतवादी हल्ला होऊ नये यासाठी हे करणे महत्त्वाचे होते. भारताने जे केले ते योग्यच होते. त्याला अमेरिकेचा पाठिंबा आहे, असे श्री ठाणेकर यांनी सांगितले.
भारताने पाकिस्तानवर हल्ला करताना जेव्हा अमेरिकेकडून शस्त्रसंधी केल्याचे जाहीर करण्यात आले. त्यावेळी यामध्ये अमेरिकेचा काहीही संबंध नव्हता. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सातत्याने प्रसार माध्यमांमध्ये राहण्यास आवडत असल्याने त्यांनी शस्त्रसंधी झाल्याचे जाहीर केल्याचे श्री ठाणेकर यांनी सांगितले. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या या वार्तालाप कार्यक्रमामध्ये ठाणेकर यांनी अमेरिका आणि भारतातील राजकीय घडामोडी, जागतिक स्तरावरील परराष्ट्र धोरणे, तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचा दृष्टिकोन या विषयांवर आपले विचार मांडले.
अमेरिकेचे इमिग्रेशन धोरण बदलण्याची गरज
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इमिग्रेशनसंदर्भात घेतलेली भूमिका ही भविष्यात देशासाठी घातक आहे. अमेरिकेच्या विकासामध्ये बाहेरील देशातून आलेल्या नागरिकांची मोठी भूमिका आहे. त्यामुळेच अमेरिका बलाढ्य देश झाला आहे. अमेरिकेमध्ये इंजिनीयर, वैज्ञानिक व डॉक्टर मोठ्या प्रमाणात तयार होत नसून, अन्य देशांतून आलेल्या नागरिकांमुळेच अमेरिकेने प्रगती केली आहे. त्यामुळेच अमेरिकेच्या सध्याच्या इमिग्रेशन धोरणामध्ये बदल करण्याची गरज आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले.
भारत हा अमेरिकेचा पूर्ण मित्र नाही
भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध मैत्रीपूर्ण असले तरी भारत हा अमेरिकेचा कधीच पूर्ण मित्र झालेला नाही. त्यामागे व्यवहार हे महत्त्वाचे कारण आहे. भारत देशातील तिसरी आर्थिक महासत्ता होण्याच्या मार्गावर असल्याने अमेरिकेच्या दृष्टीने भारताला फार महत्त्व आहे. पण अमेरिका हा व्यापाऱ्यांचा देश आहे. त्यामुळे कोणत्याही देशाने शस्त्र खरेदी किंवा अन्य व्यापार हे अमेरिकेसोबतच केल्यासच तो त्यांचा खरा मित्र असतो. पण भारताचे रशियासोबतही चांगले संबंध आहेत. भारताने रशियाऐवजी अमेरिकेकडूनच सर्व शस्त्रे खरेदी करीत नाही, तोपर्यंत भारत अमेरिकेचा पूर्ण मित्र कधीही होऊ शकत नाही, असेही ठाणेकर यांनी सांगितले.