मुंबई : काँग्रेस पक्षाच्या ‘मुंबई उत्तर- मध्य’च्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या जाहीरनाम्याचे काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी बुधवारी प्रकाशन केले. गायकवाड यांनी न्यायपत्रात मुंबईकरांवर आश्वासनांची खैरात केली आहे. मुंबई काँग्रेस कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाला विजय वडेट्टीवार, नसीम खान, बी. एम. संदीप, अमिन पटेल, सचिन सावंत आदी उपस्थित होते.

मुंबईत सर्वांसाठी पाणी, गृहनिर्माण सोसायट्यांचा जीएसटी कमी करणे, विमानतळाशेजारील रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना टीडीआर स्वरूपात वाढीव चटईक्षेत्र देणे, मतदारसंघात हवा प्रदूषण मोजणी यंत्रे, विद्यार्थांना रोबोट प्रयोगशाळा, करिअर कार्यशाळांचे आयोजन, वारसा स्थळांचे जतन करणे, झाडांची कत्तल थांबवणे, तीन महिन्यांतून एकदा नागरिक जनसुनवाई, सल्लामसल करण्यासाठी रहिवासी संघाचा कार्यगट, खेळाच्या मैदानांचे खासगीकरण थांबवणे, खासदारांशी संवादासाठी डिजिटल मंचाची स्थापना, लोकल फेऱ्यांची संख्या वाढवणे आदी शेकडो आश्वासने गायकवाड यांनी आपल्या न्यायपत्रात दिली आहेत.

satara lok sabha marathi news
अजित पवारांनी आयत्यावेळी शब्द फिरवल्याने साताऱ्यात नाराजी
Vijay Wadettiwar is away from MP Pratibha Dhanorkar felicitation ceremonies chandrapur
विस्तव कायम! खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सत्कार सोहळ्यांपासून विजय वडेट्टीवार दूरच; काँग्रेसमध्ये…
lok sabha elections 2024 rahul gandhi attacks bjp over dynasty politics
मंत्रिमंडळ नव्हे ‘परिवार मंडळ’; मंत्र्यांच्या घराणेशाहीवर बोट, राहुल गांधी यांची टीका
Chandrapur lok sabha seat, Congress MP Pratibha Dhanorkar s Claim of bjp office bearers Support her in election, Chandrapur bjp office bearers,
चंद्रपूर : धानोरकरांच्या ‘त्या’ वक्तव्याने भाजपत अस्वस्थता……पडद्यामागे राहून…
Uddhav Thackeray blunt criticism of BJP that the common man can defeat the rulers with one finger
मस्तवाल सत्ताधाऱ्यांना सर्वसामान्य एका बोटाने हरवू शकतो; उद्धव ठाकरे यांची भाजपवर बोचरी टीका
Third Lok Sabha Election under the leadership of Narendra Modi Mumbai
अबकी बार…आघाडी सरकार! तिसऱ्या कार्यकाळात मोदींची मदार मित्रांवर
bjp already has sufficient numbers to form the government says hm amit shah zws
सरकार बनवण्यासाठी पुरेसे संख्याबळ; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दावा, विरोधी पक्षाचा निर्णय जनतेकडे
Vijay Wadettiwar eknath shinde
“शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप!” माजी आरोग्य अधिकाऱ्याचं पत्र शेअर करत वडेट्टीवारांचा हल्लाबोल

हेही वाचा >>> बोरीवली कोकण रेल्वेला जोडण्याच्या कामाला मंजुरी – अश्विनी वैष्णव, हार्बर रेल्वे बोरिवलीपर्यंत; लवकरच वंदे भारत सुरू

पंतप्रधान मोदी यांनी दहा वर्षांत काय केले यावर ते बोलत नाहीत. प्रत्येक भाषणात मोदी हे हिंदू, मुस्लीम, पाकिस्तान यावर बोलत असून जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. परंतु, जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. येत्या ४ जूनला देशातील भाजपचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास काँग्रेसचे राज्य प्रभारी चेन्नीथला यांनी केला. काँग्रेस पक्षाने न्यायपत्रात ५ न्याय आणि २५ हमी दिल्या आहेत. इंडिया आघाडीला जनतेचे १०० टक्के समर्थन मिळत असून मतदानाच्या पाचव्या टप्प्यातही जनतेचे समर्थन कायम राहील, असा दावा प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केला. मुंबईकरांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी या न्यायपत्रात त्रिसूत्री बनवण्यात आली आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.