मुंबई: राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पडताळणी करण्यात येईल, असे पाच महिन्यापूर्वी महिला विकास विभागाने जाहीर केले होते. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता योजनेतील अपात्र लाभार्थींची पडताळणी आता स्थगित केली आहे.
गेल्या वर्षी जुलै मध्ये सुरु झालेल्या लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातून एकूण २ कोटी ६३ लाख अर्ज आले होते. या अर्जाची छाननी करुन पहिल्यांदा २ कोटी ३४ लाख लाडक्या बहीणींना या योजनेचा लाभ दिला गेला. त्यानंतर ही संख्या २ कोटी ४७ लाख लाडक्या बहीणींच्या अर्जावर स्थिरावली आहे. गेली तीन महिने ही संख्या कायम आहे. त्यामुळे फेब्रुवारी मध्ये या योजनेतील अपात्र लाडक्या बहीणीच्या अर्जाची पडताळणी केली जाईल या विधानाला हरताळ फासला गेला आहे.