मुंबई : हॉटेलमध्ये आलेल्या १३ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी मंगळवारी वेटरला अटक केली. आरोपीने पीडित मुलीला स्पर्श केला, तसेच स्वतःचा दूरध्वनी क्रमांक असलेला कागद तक्रारदार मुलीच्या अंगावर फेकला. शाहबाद खान रफाद खान (१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. आरोपी सध्या हॉटेलमध्येच राहत होता. तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

हेही वाचा : इंडिया आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? शरद पवारांनी सांगितली रणनीती!

हेही वाचा : “मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठीच महाविकास आघाडी सरकार…”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर गंभीर आरोप

तक्रारदार मुलगी तिचे वडिलांचे मित्र व कुटुंबियांसोबत वांद्रे येथील एका नामांकीत हॉटेलमध्ये जेवण्यासाठी सोमवारी रात्री गेली होती. त्यावेळी तेथे उपस्थित आरोपी खानने तिचा विनयभंग केला. त्याकडे दुर्लक्ष केले असता आरोपीने त्याचा मोबाइल क्रमांक लिहिलेला कागद मुलीच्या अंगावर फेकला. तसेच तिला स्पर्शही केला. त्यामुळे पीडित मुलीने याप्रकरणी वांद्रे पोलिसांकडे तक्रार केली. वांद्रे पोलिसांनी विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीला मंगळवारी अटक करण्यात आली.