कुर्ला रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाच्या कॉन्स्टेबलने एका महिला प्रवाशाचे प्राण वाचवले. पनवेलला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढताना महिलेचा तोल गेला आणि ती प्लॅटफॉर्म व लोकल ट्रेनमधील पोकळीत पडणार होती. मात्र इतक्यात प्लॅटफॉर्मवर तैनात असलेल्या आरपीएफच्या कॉन्स्टेबलने महिलेला मागे खेचले आणि ती थोडक्यात बचावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी एक महिला प्रवासी कुर्ला स्थानकात पनवेलकडे जाणारी ट्रेन पकडण्यासाठी आली. महिलेला ट्रेन पकडता आली. मात्र तिची बॅग प्लॅटफॉर्मवर पडली. बॅगेपायी महिला प्रवाशाने वेगात असलेल्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला. उतरताना महिलेचा तोल गेल्याने ती प्लॅटफॉर्म व लोकल ट्रेनमधील पोकळीत पडणार होती. मात्र, इतक्यात तिथे उपस्थित अससेल्या कॉन्स्टेबलने महिलेला मागे खेचले व तिचा जीव वाचला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch video rpf constable rescues woman passenger from run over by local train at kurla railway station
First published on: 05-04-2018 at 09:08 IST