मुंबई : मालाड पश्चिम परिसरातील लिबर्टी जलबोगदा येथे १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्याचे निदर्शनास आले असून या जलवाहिनीतून पाणी गळती सुरू झाल्यामुळे दुरुस्तीच्या कारणास्तव मालाड पश्चिम, गोरेगाव पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवार, २५ जानेवारी २०२५ रोजी बंद राहणार आहे.

जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी २४ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजता हाती घेण्यात येणार आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम शनिवारी २५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे मालाड पश्चिम आणि गोरेगाव पश्चिम परिसरातील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवार, २५ जानेवारी २०२५ रोजी बंद राहणार आहे. या परिसरातील नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या विभागात पाणीपुरवठा बंद

मालाड पश्चिमेकडील अंबुजवाडी, आजमी नगर, जनकल्याण नगर येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.गोरेगाव पश्चिम येथील उन्नत नगर, बांगुर नगर, शास्त्री नगर, मोतीलाल नगर, सिद्धार्थ नगर, जवाहर नगर, भगतसिंग नगर, राम मंदिर मार्ग येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.