मुंबई: मागील काही दिवस मुंबईत ढगाळ वातावरण अनुभवायला मिळाले. त्यानंतर मुंबईकरांना गुलाबी थंडीची अपेक्षा होती. मात्र, मुंबईत २९ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य भारत आणि मध्य भारतावर पश्चिमी प्रकोपाचा परिणाम होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यातही काही भागात मळभ असेल.

वातावरण कोरडे राहण्याच्या शक्यतेबरोबरच २८ डिसेंबरनंतर किमान तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईत पश्चिमी प्रकोप आणि पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या एकत्रित परिणामामुळे ३० आणि ३१ डिसेंबर रोजी ढगाळ वातावरण अधिक जाणवेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रणालीमुळे किमान तापमानात वाढ होईल. परंतु फारसा उष्मा जाणवणार नाही, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा… पाच वर्षांपासून वैद्यकीय शिक्षण संचालक हंगामीच; पूर्णवेळ नियुक्ती करण्याचा सरकारलाही विसर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी २१.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली तर सांताक्रूझ केंद्रात १८.७ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. दरम्यान, मंगळवारी सांताक्रूझ येथील किमान तापमान सोमवारपेक्षा २ अंशांनी वाढले आहे तर कुलाबा येथे सोमवार इतकेच नोंदले गेले आहे. बुधवारपासून पुन्हा एकदा पारा २० अंशाच्या वर जाईल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.