मुंबई : पश्चिम रेल्वेवरील लोअर परळ स्थानकादरम्यान सकाळच्या सुमारास झाडाची फांदी रेल्वे मार्गावर पडल्याने, काही काळ लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर घटनास्थळी रेल्वे कर्मचारी पोहचले आणि त्यांनी झाडाची फांदी रेल्वे मार्गावरून हटवली. सकाळी ११.५९ वाजता लोकल सेवा पूर्वपदावर आली, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली. तसेच पश्चिम रेल्वेवरील लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.