Ratan Tata Pet Dog Video: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देश हळहळला आहे. लोक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. त्यांना मुंबईत अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय क्षेत्रातील मंडळी, कलाकार आणि सर्वसामान्य लोकांनी गर्दी केली होती. याच गर्दीतील त्यांच्या लाडक्या पाळीव श्वानाचा व्हिडीओ पाहून लोक भावुक झाले आहेत.

रतन टाटा यांचं प्राणी प्रेम सर्वांनाच माहीत आहे. त्यांना प्राण्यांची खासकरून श्वानांची जास्त आवड होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचा पाळीव श्वान ‘गोवा’ याला अंत्यदर्शनासाठी आणलं होतं. त्यांच्या श्वानाने काहीच खाल्लं-प्यायलं नव्हतं. आता दुसऱ्या एका व्हिडीओत त्याने जेव्हा रतन टाटा यांना शेवटचं पाहिलं तेव्हाचा क्षण पाहायला मिळतोय. हा व्हिडीओ पल्लव पालिवाल नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – मुक्या प्राण्याची माया! रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचा पाळीव श्वान उपाशी, अंत्यदर्शनाचा भावुक करणारा Video

रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता. त्यांचे कुटुंबीय आणि टाटा समुहाचे कर्मचारीदेखील होते. या सर्वांमध्ये त्यांचा लाडका ‘गोवा’ देखील आला होता. एका व्हिडीओत दिसतंय की ‘गोवा’ रतन टाटा यांच्या शवपेटीजवळ बसतो. शांतनू आणि इतर काही जण त्याला त्याला शांत करतात. कार्टूनिस्ट सतिश आचार्य यांनी हा भावुक करणारा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा – कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची रतन टाटांशी भेट अन् मैत्री कशी झाली? वाचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हिडीओ –

रतन टाटा यांनीच या श्वानाचे नाव ‘गोवा’ ठेवले होते. हा श्वान रस्त्यावर सापडला होता. ११ वर्षांपूर्वी टाटाचा एक कर्मचारी कामासाठी गोव्याला गेला होता आणि त्याला रस्त्यात एक कुत्रा दिसला, तो त्याला मुंबईला घेऊन आला. तो गोव्यात सापडल्याने टाटांनी त्याचे नाव गोवा ठेवले. हा श्वान बॉम्बे हाऊसमध्ये राहतो, असं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे.