लैंगिक अत्याचार झालेल्या मुलींच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदत म्हणून ज्याप्रमाणे ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत नुकसान भरपाई देण्यात येते. त्याप्रमाणे लैंगिक अत्याचार झालेल्या मुलांसाठी अशी योजना का नाही, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी उपस्थित केला. शिवाय सुधारगृहातील मुलांवर लैंगिक अत्याचार होत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याकडे लक्ष वेधत त्या पाश्र्वभूमीवर सरकारने अशा मुलांसाठीही मुलींप्रमाणे नुकसान भरपाईचे धोरण आखावे, अशी सूचना केली. तसेच त्याबाबत दोन आठवडय़ांमध्ये उत्तर दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत. शहापूर येथील आश्रमशाळेतील अल्पवयीन गतिमंद मुलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेत स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली होती. याप्रकरणी सोमवारी खंडपीठासमोर सुनावणी झाली.
संग्रहित लेख, दिनांक 1st Sep 2015 रोजी प्रकाशित
‘अत्याचारग्रस्त मुलांसाठी ‘मनोधैर्य’सारखी योजना का नाही?’
लैंगिक अत्याचार झालेल्या मुलींच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदत म्हणून ज्याप्रमाणे ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत नुकसान भरपाई देण्यात येते.
First published on: 01-09-2015 at 04:24 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why not sexual abuse childrens get compensation ask bombay high court