दादर पश्चिम येथील इमारतीच्या छतावरून उडी मारून ६४ वर्षीय महिलेने बुधवारी आत्महत्या केली. या महिलेला कर्करोग झाला होता. त्यामुळे मानसिकरित्या खचल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत दादर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>> मुंबई विमानतळावरून ५४ कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त, झांबियातून तस्करी करणाऱ्या दिल्लीतील महिलेला अटक

Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”

रोहिणी रमेश पाटील (६४) असे मृत महिलेचे नाव असून त्या दादर पश्चिम येथील वर्तक हॉल समोरील साईकृपा इमारतीत कुटुंबासमवेत रहायच्या. सात मजली साईकृपा इमारतीच्या गच्चीवर पाटील रोज सकाळी फेरफटका मारण्यासाठी जायच्या. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी त्या इमारतीच्या गच्चीवर गेल्या. त्यानंतर काही वेळाने इमारतीच्या खाली त्याचा मृतदेह सापडला. पाटील यांना कर्करोग झाला होता. त्यामुळे त्या मानसिक तणावाखाली होत्या. अनेक वेळा त्यांनी आजारपणाबाबत कुटुंबीयांकडे खंतही व्यक्त केली होती, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश मुगुटराव यांनी दिली. रोहिणी पाटील यांच्यावर जानेवारीत शस्त्रक्रिया झाली होती. संपूर्ण आयुष्य निरोगी जगल्यानंतर वयाच्या ६४ व्या वर्षी कर्करोग झाल्यामुळे त्या मानसिक तणावाखाली होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून व नात असा परिवार आहे.