मुंबई : वांद्रे (पूर्व) येथील इंदिरा कृपा हौसिंग सोसायटी येथे सोमवारी रात्री ११.३४ च्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळली. या इमारतीला लागून असलेल्या चाळीवरच भिंत कोसळली. या दुर्घटनेत एका कुटुंबातील दोन मुली जखमी झाल्या असून त्यांना तत्काळ गुरुनानक रुग्णालयात नेण्यात आले. कोमल येवले (२५ वर्षे) आणि प्रणिता येवले (२८ वर्षे) अशी या दोघींची नावे असून त्यापैकी कोमलची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, १०८ रुग्णवाहीका सेवा आणि महानगरपालिकेचे विभाग कार्यालयातील कर्मचारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य सुरू केले.