मुंबईतल्या वरळी भागात भरधाव वेगात बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेला चिरडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. या अपघातानंतर आरोपीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, २४ तासांच्या आतच त्याला जामीन मिळाला. यानंतर विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

हेही वाचा – Worli Hit and Run Case: मुंबई हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शाह आहे तरी कोण?

दरम्यान, या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे पती प्रदीप नाखवा यांनीही या जामिनावर नाराजी व्यक्त करत याला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. पीटीआयला त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांचा आक्रोश अशरक्षः मन हेलावून टाकणारा होता.

नेमकं काय म्हणाले प्रदीप नाखवा?

“मी त्याला ( आरोपीला ) गाडी थांबवण्याची विनंती करत होतो. मी त्याच्या गाडीच्या बोनेटवर जोरात हात मारला. मात्र, तरीही त्याने गाडी थांबवली नाही. तो भरधाव वेगाने गाडी चालवत होता. त्यावेळी तिला ( महिलेला ) किती वेदना झाल्या असतील? हे सर्वांना माहिती आहे. मात्र, कोणीही कारवाई करायला तयारी नाही. गरीबांसाठी या देशात कुठेही न्याय नाही”, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

राजेश शाहांना मिळालेल्या जामिनावर म्हणाले…

राजेश शाहांना मिळालेल्या जामिनावर बोलताना ते म्हणाले, “या सगळ्याला प्रशासन जबाबदार आहे. हे प्रशासन फक्त श्रीमंत लोकांसाठी काम करतं. इथे गरिबांना कुणीही वाली नाही. इथे फक्त राजकारण चालतं”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – Worli Hit And Run Case : राजेश शाहांना २४ तासांच्या आत दिलासा, १५ हजारांच्या तात्पुरत्या बाँडवर जामीन मंजूर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, याप्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह अद्यापही फरार आहे. त्याच्या विरोधात लूक आऊट नोटीस देखील जारी करण्यात आली आहे. या प्रकरणात राजेश शाह आणि त्यांच्या वाहनचालकाला अटक झाली. मात्र, न्यायालयाने राजेश शाह यांना जामीन मंजूर केला.