वांद्रे येथील ‘म्हाडा’च्या आवारात एका कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याबाबतची माहिती ‘म्हाडा’च्या सुरक्षा रक्षकाने खेरवाडी पोलीस ठाण्याला दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव स्वप्निल नामदेव बामणे असल्याचे समजते. घटनास्थळी मद्याची रिकामी बाटलीही सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्वप्निलच्या पालकांचे निधन तो लहान असतानाच झाले होते. त्याचे काका कुळगांव, बदलापूर येथे राहतात. त्याच्या काकांचा जबाब नोंदवण्याचे काम चालू असून या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.