आणखी १८ नवीन बाधितांची भर

नागपूर : उपराजधानीत दिवसभरात १८ नवीन करोनाबाधितांची भर पडली. आजपर्यंत  मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयांत तब्बल २१ करोनाबाधितांचे मृत्यू नोंदवण्यात आले. यापैकी निम्म्याच्या जवळपास म्हणजे १० मृत्यू हे केवळ जून महिन्यातील आहेत.

राज्यातील इतर भागांच्या तुलनेत सर्वात कमी मृत्यू  शहरात झाले. त्यामुळे राज्य शासनासह केंद्रीय आरोग्य मंत्रालयापर्यंत नागपूरच्या करोना व्यवस्थापनाची प्रशंसा होत आहे. दरम्यान, शहरात झालेल्या आजपर्यंतच्या २१ मृत्यूंमध्ये ८ मृत्यू हे बाहेरच्या जिल्ह्य़ातून अत्यवस्थ अवस्थेत आलेल्यांचे आहेत. आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, शहरात एप्रिल महिन्यात करोनाचा पहिला बळी  ५ एप्रिलला नोंदवण्यात आला. सतरंजीपुरातील या ६८ वर्षीय वृद्धाला दगावलेल्या अवस्थेत मेयोत आणण्यात आले होते.

दरम्यान, २९ एप्रिलला मोमीनपुरातील ७० वर्षीय दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू मेयोत झाला. त्यानंतर मे महिन्यात सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवर आढळलेल्या भिक्षेकरूसह इतरही नऊ मृत्यू नोंदवण्यात आले होते. जून महिन्यात ४ जूनपासून आजपर्यंत तब्बल १० मृत्यूंची नोंद मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयांमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या एकूण करोना मृत्यूंची संख्या ही २१ वर पोहचली आहे. दरम्यान, नवीन करोनाबाधित आढळण्याचा प्रकार मंगळवारीही कायम  होता. दिवसभरात आढळलेल्या १४ नवीन बाधितांत ३ रुग्ण परसोडी, १ नालसाहेब चौक, १ शास्त्रीनगर, २ नंदनवन, १ उमरेड, १ जुना भंडारा रोड, १ शास्त्रीनगर, २ नंदनवन, १ उमरेड आणि १ इतर ठिकाणचा आहे. या रुग्णांमुळे शहरातील आजपर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या  १,३२९ वर पोहचली आहे. यापैकी ९७० च्या जवळपास व्यक्ती करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

दिवसभरात ४२ करोनामुक्त

दिवसभरात ४३ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयांतून सुट्टी दिली गेली. यापैकी २० जण मेयो, २२ जण मेडिकल तर एक जण एम्स रुग्णालयात उपचार घेत होता.

नवीन प्रतिबंधित भाग

आज मंगळवारी लकडगंज झोनअंतर्गत शास्त्रीनगर (पडोळे स्लम) एनआयटी उद्यान ते पाठराबे यांचे घर, जगताप, डोंगरवार, नागनदी संरक्षण मिभंत, काळे व पाहुणे यांचे निवासस्थान परिसर, लक्ष्मीनगर झोनअंतर्गत त्रिमूर्तीनगर रिंग रोड परिसरात अमेय अपार्टमेंटच्या बाजूला संजीवनी , महेंद्र अ‍ॅन्द महेंद्र, अपार्टमेंट, रिंग रोड, मधुमालती अपार्टमेंट परिसर , नेहरूनगर झोनअंतर्गत न्यू गाडगेबाबा नगर परिसरात बंडू तिजारे, गोपाल मिसाळ, विजय कडू, हनुमान मंदिर कमलाकर भुजाडे यांचे निवासस्थान परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. धंतोली झोनमध्ये वेणूवन हाऊसिंग सोसायटी नरेंद्रनगर, गांधीबाग झोनमध्ये सिरसपेठ, बजेरिया नागेश्वर मंदिर, लकडगंज झोनमध्ये शिवाजी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी परिसरात आता करोना रुग्ण नसल्यामुळे हा परिसर मोकळा करण्यात आला आहे.

आजपर्यंत दगावलेले रुग्ण

दिनांक        वय           पत्ता

५ एप्रिल    ६८ पुरुष   सतरंजीपुरा

२९ एप्रिल  ७० पुरुष     मोमिनपुरा

५ मे   २२  पुरुष      पार्वतीनगर

११ मे  २९  पुरुष     पांढराबोडी

१६ मे  ६५ पुरुष       गड्डीगोदाम

१७ मे  ५४  पुरुष     शांतीनगर

१८ मे ७० महिला      मोमिनपुरा

२५ मे   ५४  पुरुष      सतरंजीपुरा

२७ मे   ७१ महिला      सतरंजीपुरा

३० मे    पुरुष          (भिक्षेकरू)

३१ मे        ७३ पुरुष       हिंगणा रोड

४ जून         ६५  पुरुष      अमरावती</p>

४ जून         ६२ महिला      मध्यप्रदेश

७ जून         ५८ महिला     अमरावती

८ जून         ४२  पुरुष      हंसापुरी

१२ जून        ५६  पुरुष      अकोला</p>

१५ जून        ५०  पुरुष      मध्य प्रदेश

१७ जून        ६४  पुरुष      कन्हान

२१ जून         ४०  पुरुष       जबलपूर

२२ जून        ३६  पुरुष      बडनेरा

२२ जून        ७४  पुरुष     अमरावती