02 June 2020

News Flash

आयुर्वेद महाविद्यालयाचा अधिकारी लाच घेताना जेरबंद

पवार मूळ पुण्यातील रहिवासी असून, त्यांच्या पुणे येथील घराचीही एसीबीचे पथक झडती घेत आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

नागपूर :  सफाई कामगार पदावर नियुक्तीपत्र देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेणाऱ्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहात अटक केली. बंडू देसाई पवार (५५) रा. जुनी शुक्रवारी, सक्करदरा असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

बंडू पवार हे रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी असून त्यांच्याकडे सहाय्यक संचालक पदाचाही अतिरिक्त कारभार आहे. सक्करदरा भागात राहणाऱ्या तक्रारदाराचे नातेवाईक एक वर्षांपूर्वी निवृत्त झाले. त्याच्या जागी नातवाला सफाई कामगाराची नोकरी मिळावी यासाठी अर्ज करण्यात आला. अर्जदार मूळ यवतमाळ येथील रहिवासी आहे. नियुक्तीचा अधिकार सहाय्यक संचालकाकडे असल्याने तक्रारदाराने पवार यांच्याशी संपर्क साधला. पवार यांनी तक्रारदाराला दोन लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक योगिता चाफले, संजीवनी थोरात, रेखा यादव, मंगेश कळंबे, रविकांत डहाट, अचल हरगुळे, सरोज बुधे व बन्सोड यांनी बुधवारी सक्करदरा भागात सापळा रचला. तक्रारदार पवार यांच्या घरी गेला. पवार यांनी तक्रारदाराला दोन लाख रुपये पलंगावर ठेवायला सांगितले. सायंकाळी नियुक्तपत्र देण्याचे आश्वासन दिले. याचवेळी एसीबीच्या पथकाने पवार यांना अटक केली. दोन लाख रुपये जप्त केले. पवार यांच्याविरुद्ध सक्करदरा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या जुनी शुक्रवारीतील घराची झडती घेण्यात आली.

पवार मूळ पुण्यातील रहिवासी असून, त्यांच्या पुणे येथील घराचीही एसीबीचे पथक झडती घेत आहेत.

जीवन प्राधिकरणातील लेखापालही अडकला

कंत्राटाची देयके मंजूर करण्यासाठी १ हजार रुपयांची मागणी करणारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील लेखापालाला एसीबीने पकडले. राजेश भीमराव हाडके (५४) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार यांना १० गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेचे कंत्राट मिळाले होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी २५ ऑक्टोबर २०१९ ला देयके सादर केली होती. ही देयके मंजूर करण्यासाठी आरोपीने त्यांना एक हजार रुपयांची लाच मागितली. त्यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने चौकशी करून आरोपीला रंगेहात पकडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2020 1:47 am

Web Title: ayurveda college officer arrested for taking bribe zws 70
Next Stories
1 लोकजागर : ‘आदरणीयांचे’ अवमूल्यन?
2 शिकवलेल्या अभ्यासक्रमाचे तपशील तरी तात्काळ सादर करा!
3 टाळेबंदीतील शिथिलतेने भाज्यांचे भाव कडाडले
Just Now!
X